Tax Free Countries : या देशांतील लोकांना कर भरावा लागत नाही! जाणून घ्या, कसे चालते त्या देशातील सरकार

Tax Free Countries : भारतातील प्रत्येक पगारदार व्यक्ती, ज्याचा पगार टॅक्स स्लॅबमध्ये येतो, त्याला त्याच्या पगाराचा काही भाग कर म्हणून भरावा लागतो.
Tax Free Countries
Tax Free CountriesDainik Gomantak
Published on
Updated on

भारतातील प्रत्येक पगारदार व्यक्ती, ज्याचा पगार टॅक्स स्लॅबमध्ये येतो, त्याला त्याच्या पगाराचा काही भाग कर म्हणून भरावा लागतो. देशातील प्रत्येक सरकार आपल्या नागरिकांकडून कर वसूल करते. हा कर आयकर, मालमत्ता कर, वीज कर, पाणी कर इत्यादी वेगवेगळ्या स्वरूपात घेतला जातो.

(Tax Free Countries)

Tax Free Countries
Health Tips : हृदय रुग्णांनी अंडी खावीत की नाही? जाणून घ्या

तुम्ही प्रत्यक्ष कर भरत नसले तरी तुम्ही अप्रत्यक्ष कर भरता. या करांच्या पैशातून सरकार देशातील विविध विकास कामे, अनुदाने आणि सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देते. करांशिवाय सरकार किंवा देश चालवणे अशक्य आहे. करप्रणाली केवळ भारतातच नाही तर जगाच्या विविध भागात लागू आहे, मात्र जगात असे काही देश आहेत जिथे सरकार नागरिकांकडून कर वसूल करत नाही.

आता सर्वात मोठा प्रश्न असा पडतो की जेव्हा या देशांची सरकारे त्यांच्या नागरिकांकडून कर घेत नाहीत, तर मग त्यांचा खर्च कसा काढायचा? चला जाणून घेऊया की कोणत्या देशांतील नागरिकांना टॅक्सच्या रूपात 1 पैसाही भरावा लागत नाही. यासोबतच या देशांच्या सरकारचे उत्पन्नाचे स्रोत काय :

या देशांमध्ये सरकार कर आकारत नाही

जगात असे अनेक देश आहेत जिथे सरकार आपल्या नागरिकांकडून एक रुपयाही कर आकारत नाही. कतार, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, बहरीन, कुवैत, बर्मुडा या देशात कर आकरला जात नाही. अनेक देशांमध्ये नागरिकांना कर भरावा लागत नाही. या सर्व देशांचा जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

सरकार कमावते कसे?

आता सर्वात मोठा प्रश्न असाही उभा राहतो की जर हा देश आपल्या नागरिकांकडून कराच्या रूपाने पैसा वसूल करत नाही, तर ते कमवायचे कसे? हे देश करातून उत्पन्न मिळवण्याऐवजी आयात शुल्कावर अवलंबून असतात. इतर कोणत्याही देशाचा माल या देशांत आला तर हे देश या उत्पादनांवर भरपूर पैसे आकारतात. याशिवाय पर्यटन आणि कच्च्या तेलाची विक्री करून ते दरवर्षी बंपर कमावतात. या देशांमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना निर्गमन आणि आगमन दोन्हीसाठी कर भरावा लागतो.

सेल्फ वर्किंग मॉडेलवर काम केले जाते

हे देश सेल्फ-वर्किंग मॉडेलवर काम करतात, म्हणजेच ते त्यांच्या विभागाचा खर्च स्वतः उचलतात. उदाहरणार्थ, जर या देशांमध्ये रेल्वे धावत असेल तर ते ऑपरेशन चार्जेस, कर्मचाऱ्यांचे पगार यांसारखे खर्च त्यांच्या कमाईतून चालवतात. यासाठी सरकार वरून कोणतीही अतिरिक्त मदत देत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com