PF Claim New Rules Dainik Gomantak
अर्थविश्व

PF Claim New Rules: PF खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! प्रोफाइल फोटो अपडेट नसेल तर क्लेम होणार 'रिजेक्ट'; येथे पाहा संपूर्ण स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

EPFO New Rules Profile Photo Mandatory: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या कोट्यवधी पीएफ खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा नियम लागू केला.

Manish Jadhav

EPFO New Rules Profile Photo Mandatory: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या कोट्यवधी पीएफ खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा नियम लागू केला. हा नवीन नियम पीएफ खात्याचा प्रोफाईल फोटो, क्लेम प्रक्रिया आणि ई-नॉमिनेशन यांच्याशी थेट निगडित आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचे पीएफ खाते असेल, तर आता कोणताही क्लेम करण्यापूर्वी तुम्हाला या नवीन नियमाचे पालन करावेच लागेल, अन्यथा तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. अनेकदा कर्मचारी आपल्या पीएफ प्रोफाईलवरील फोटोकडे दुर्लक्ष करतात किंवा तो अपडेट ठेवत नाहीत. मात्र, आता प्रोफाईल पूर्ण नसणे किंवा फोटो अपडेट नसणे तुमच्यासाठी अडचणीचे ठरु शकते.

ईपीएफओच्या (EPFO) नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर तुमच्या पीएफ प्रोफाईलवर फोटो अपडेट नसेल, तर तुम्हाला ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही. ई-नॉमिनेशन न झाल्यामुळे तुम्हाला पीएफ काढण्यासाठी क्लेम करता येणार नाही, तसेच तुम्ही आधीच सबमिट केलेले क्लेम देखील मधल्या मधे अडकू शकतात किंवा थेट रिजेक्ट केले जाऊ शकतात. ईपीएफओ आपल्या खातेधारकाची पडताळणी करण्यासाठी आणि ओळख पटवण्यासाठी प्रोफाईल फोटोचा वापर करते.

जरी प्रत्येक छोट्या कामासाठी फोटोची गरज नसली, तरी ई-नॉमिनेशन आणि क्लेम सेटलमेंटसारख्या महत्त्वपूर्ण सेवांसाठी फोटो अनिवार्य करण्यात आला आहे. प्रोफाईलवर योग्य फोटो असल्यास पीएफशी संबंधित क्लेम जलद गतीने निकाली काढण्यास मदत होते.

हा प्रोफाईल फोटो अपडेट करण्यासाठी खातेधारकाने सर्वप्रथम ईपीएफओच्या अधिकृत 'युनिफाइड मेंबर पोर्टल'ला भेट देणे आवश्यक आहे. तिथे आपला युएएन (UAN) नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगइन करावे. त्यानंतर 'व्ह्यू' किंवा 'प्रोफाईल' सेक्शनमध्ये जाऊन फोटो अपडेट करण्याचा पर्याय निवडावा. तिथे आपला नवीन पासपोर्ट साईझ फोटो अपलोड करावा आणि तो व्यवस्थित दिसत असल्याची खात्री करुन 'सेव्ह' बटणावर क्लिक करावे.

केवळ प्रोफाईल फोटोच नाही, तर सुरक्षिततेच्या दृष्टीने पीएफ खातेधारकांनी आपला आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, बँक खाते, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देखील पूर्णपणे अपडेट आणि व्हेरिफाय करुन घेणे गरजेचे आहे. यामुळे ऑनलाईन पीएफ काढणे, पेन्शन, ई-नॉमिनेशन आणि क्लेम सेटलमेंटची सर्व कामे कोणत्याही अडथळ्याविना अगदी सहजरित्या पूर्ण होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer: महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Sport: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rice Farming Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

Goa Stunt Viral: रिलच्या नादात 'बाहुबली' स्टंट अंगाशी; चालत्या वाहनाच्या छतावर उभे तिघे अचानक कोसळले, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT