Epfo Dainik Gomantak
अर्थविश्व

EPFO: नोकरी करणाऱ्यांना मिळणार 7 लाख रुपये, या सरकारी योजनेचा घेऊ शकता लाभ

EPF Insurance Death Claim: तुमचा EPFO ​​द्वारे विमा उतरवला आहे.

दैनिक गोमन्तक

EDLI Scheme: शासनाच्या अशा अनेक योजना आहेत, ज्याबद्दल लोकांना माहिती नाही आणि योजनेची माहिती नसल्यामुळे पात्र लोकांनाही त्याचा लाभ घेता येत नाही. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे म्हणजे EPFO ​​चे सदस्य असाल तर तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की, तुमचा EPFO ​​द्वारे विमा उतरवला आहे. तुम्हाला हा विमा कधी मिळेल? याबद्दलही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हाला EPFO ​​पोर्टलवर एक महत्त्वाचे काम करायचे आहे, तेही तुम्ही वेळेवर करावे.

ई-नामांकन अनिवार्य

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) खातेधारकांसाठी ई-नामांकन अनिवार्य केले आहे. जर तुम्ही ई-नामांकन केले नाही तर तुम्हाला पीएफ पोर्टलवर कोणतीही सुविधा मिळणार नाही. नॉमिनी अपडेट ठेवल्याने खातेधारकाच्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा मिळते. यासाठी ईपीएफओने यापूर्वीही अनेकदा अलर्ट जारी केले होते.

काय अद्यावत करणे आवश्यक

ईपीएफओने नॉमिनी अपडेट करण्यासाठी खातेधारकांना अनेक अलर्ट जारी केले होते. नॉमिनी अपडेट करण्यासाठी, तुम्हाला नॉमिनीचे नाव, जन्मतारीख यासारखी माहिती भरावी लागेल. खातेदाराने नॉमिनी लवकरात लवकर अपडेट करावे, असे संस्थेकडून सांगण्यात आले आहे. नॉमिनी अपडेट न केल्यास सदस्याच्या कुटुंबीयांना नंतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते, कारण खातेदाराच्या मृत्यूनंतर नॉमिनी किंवा कुटुंबातील सदस्यांना पीएफ, पेन्शनशी (Pension) संबंधित पैसे काढण्यासाठी मदत मिळते. जर तुम्ही नॉमिनीला अपडेट ठेवत असाल तर तुम्ही ऑनलाइनही दावा करु शकता.

ईपीएफओ 7 लाख रुपये देणार

सदस्याचा (Member) विमा देखील EPFO ​​द्वारे केला जातो. या अंतर्गत सदस्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही नॉमिनी अपडेट न ठेवल्यास कुटुंबातील सदस्यांना हा विमा मिळण्यास त्रास होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT