EPF अकाऊंट बदलण्याच टेंशन विसरा  Dainik Gomantak
अर्थविश्व

EPF अकाऊंट बदलण्याच टेंशन विसरा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

तुम्ही जर नोकरी (Job) करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. या नवीन नियमानुसार, नोकरी बदलल्यानंतर, इपीएफ (EPF) खाते आपोआप कर्मचाऱ्याच्या नवीन कंपनीकडे (Company) ट्रान्सफर (Transfer) केले जाईल. आतापर्यंत नियम (Rules) हा लागू झाला नव्हता. जर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे नोकरी (Job) बदलल्यानंतरही इपीएफ (EPF) खाते क्रमांक तोच राहील. सध्या युएएन (UAN) क्रमांक तोच आहे पण इपीएफ (EPF) खाते क्रमांक बदलतो.

एखाद्या इपीएफ (EPF) सदस्याने एक नोकरी सोडून दुसरी नोकरी केली तर नवीन कंपनीमध्ये नवीन इपीएफ (EPF) खाते उघडले जाईल. यामुळे कर्मचाऱ्याने पूर्वीच्या कंपनीकडे ठेवलेल्या इपीएफ (EPF) खात्यात जमा केलेले पैसे नवीन खात्यात ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया (Process) सदस्य सेवा पोर्टलद्वारे पूर्ण केली जाते. परंतु याकरिता युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि आधार कार्ड (Aadhar card) लिंक (Link) करणे आवश्यक आहे. तसे नसल्यास नवीन कंपनीला एक फॉर्म (Form) सबमीट (Submit) करावा लागेल.

EPF ट्रान्सफर करणे आवश्यक

इपीएफची (EPF) रक्कम वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये असली तरीही, पाच वर्षे सतत सेवा असेल तरच करातून सूट मिळते. खाते ट्रान्सफर (Transfer) न केल्यास मागील कंपनीसोबत घालवलेला कालावधी सेवेच्या कालावधी सेवेच्या कालावधीत गणला जात नाही. जर तुमच्याकडे सलग पाच वर्षे सेवा नसेल, तर तुमच्या पूर्वीच्या इपीएफ (EPFO) खात्यातील व्याजासह मिळालेली रक्कम काही अटींच्या अधीन राहून करपात्र होईल.

परंतु नव्या नियमांच्या (Rules) अंमलबजावणीमुळे वेळोवेळी नोकरी (Job) बदलणाऱ्या लोकांना फायदा होईल. यासाठी इपीएफओ (EPFO) ने C-DAC द्वारे केंद्रीकृत IT-सक्षम प्रणाली विकसित करण्यास मान्यता दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT