Elon Musk
Elon Musk Dainik Gomantak
अर्थविश्व

ट्विटरच्या शेयरहोल्डर्सने केला इलॉन मस्कवर गुन्हा दाखल, जाणून घ्या कारण

दैनिक गोमन्तक

एलन मस्क आणि ट्विटर अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. अशातच ट्विटरच्या शेअर होल्डर्सनी एलन मस्कविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एलन मस्क यांनी ट्विटर खरेदीची घोषणा केल्यापासून ते सतत खोटे ट्विट आणि विधाने करून ट्विटरच्या शेअर्सच्या किंमती खाली आणण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे त्याचे शेअर्स खाली आले आहेत आणि शेअरधारकांना त्याचा फटका बसला आहे, असे या तक्रारी मागचे कारण सांगितले जात आहे.

जाणून घ्या काय आहे हे संपूर्ण प्रकरण -

ट्विटरच्या शेअरहोल्डर्सचा आरोप आहे की, एलन मस्कने जाणूनबुजून ट्विटरच्या शेअर्सच्या किंमती कमी केल्या आहेत, जेणेकरून त्यांना ट्विटरची डील कमी किमतीत मिळावा अन्यथा त्यांना 44 अब्ज टाळण्याची संधी आहे.

या प्रकरणात काय आरोप आहेत

एलन मस्क यांनी जाणूनबुजून असे ट्विट आणि विधाने केली आहेत, ज्यामुळे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या शेअर्समध्ये जागतिक स्तरावर घसरण झाली आहे आणि कंपनीची किंमत खाली आली आहे. बुधवारी, विल्यम हेरेस्नियाक यांनी ट्विटरच्या शेअरहोल्डर्सच्या वतीने एलन मस्क विरोधात हा खटला दाखल केला.

ट्विटरवर एलन मस्कच्या डीलची स्थिती काय आहे

एप्रिलमध्ये, एलन मस्कने ट्विटर विकत घेण्यासाठी 44 बिलियन डीलची घोषणा केली आणि तेव्हापासून ते ट्विटरवर काही तरी कारण काढून विवाद करत आहेत. स्पॅम खात्यांना लक्ष्य करण्यासाठी मस्क ट्विटरवर आले आणि नंतर अलीकडेच करारावर तात्पुरती होल्ड जाहीर केली. सध्या ट्विटरचे सीईओ भारतीय वंशाचे पराग अग्रवाल आणि एलन मस्क यांच्यात सतत वाद सुरू असून मस्क ट्विटर डीलबाबत सतत नकारात्मक ट्विट करत आहेत.

ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनीही संचालक मंडळावरून पायउतार केले. या पुर्वी जॅक डोर्सी यांनी ट्विटरच्या संचालक मंडळावरून पायउतार झाले, कारण टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी त्यांना पदावरून काढून टाकले. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरशी संघर्ष करत आहे. डोर्सी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ट्विटरचे सीईओ पद सोडले आणि भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांच्याकडे कारभार सोपवला.

टेस्लाचे शेअर्स अलीकडेच 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेल्याने टेक अब्जाधीश एलन मस्क यांची संपत्ती 200 अब्जच्या खाली आली आहे. टेस्लारातीच्या म्हणण्यानुसार, मस्कने आतापर्यंत त्यांच्या एकूण संपत्तीपैकी सुमारे 77.6 अब्ज गमावले आहेत. सध्या टेस्ला स्टॉकवर प्रचंड दबाव आहे, वर्षाच्या सुरुवातीपासून कंपनाचे शेअर्स सुमारे 40 टक्क्यांनी खाली आले आहेत, परिणामी मस्कच्या नेट वर्थमध्ये मोठी घसरण झाली आहे.

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, 25 मे पर्यंत मस्कची एकूण संपत्ती 193 अब्ज आहे. याचा अर्थ या वर्षाच्या सुरुवातीपासून मस्कच्या संपत्तीत 77.6 अब्जची घट झाली आहे. मात्र, मस्क अजूनही एकूण संपत्तीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांचे सर्वात जवळचे प्रतिस्पर्धी, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, सध्या 128 अब्ज संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Taleigao Election Result: ताळगावमधून युनायटेड ताळगावकरचा सुफडा साफ, मंत्री बाबूश यांचे पॅनल विजयी

Sattari News : सत्तरीत तालुक्यात नदी परिसरात जिलेटिनचा धोका वाढला; जलप्रदूषणाची शक्यता

Air Pollution: वायू प्रदूषणानं वाढवली चिंता! टाईप 2 डायबिटीजच्या रुग्णांमध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढ; संशोधनातून खुलासा

Goa Today's Live News Update: पणजी कधीच सोडणार नाही, अनेकांची स्वप्न ही स्वप्नच राहतील! मोन्सेरात

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

SCROLL FOR NEXT