Elon Musk Dainik Gomantak
अर्थविश्व

एलन मस्कचे शेअर्स गडगडले, टेस्ला मधील 10% कर्मचारी काढून टाकण्याची नोटीस

टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्कच्या टेस्ला कंपनीचे शेअर्स शुक्रवारी नऊ टक्क्यांनी खाली आले

दैनिक गोमन्तक

टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एलन मस्कच्या टेस्ला कंपनीचे शेअर्स शुक्रवारी नऊ टक्क्यांनी खाली आले. दहा टक्के कर्मचार्‍यांची छाटणी आणि कोणत्याही कारणाशिवाय इलेक्ट्रिक वाहनांना विनाकारण (Electric Vehicle) ब्रेक लागल्याच्या तक्रारींमुळे हे शेअर्स नऊ टक्क्यांपर्यंत घसरले. (Elon Musk Shares)

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मस्कने 'सर्व प्रकारच्या अपॉइंटमेंट्स थांबवण्याच्या' नावाने कंपनीच्या अधिकाऱ्यांना ईमेल पाठवला होता. या ईमेलमध्ये त्यांनी म्हटले आहे की त्यांना अर्थव्यवस्थेबद्दल 'खूप वाईट वाईब्स येत' म्हणून कंपनीतून काही लोकांना काढून टाकण्याची गरज आहे.

कंपनीने नुकत्याच दाखल केलेल्या नियामक माहितीनुसार, टेस्लामध्ये सध्या सुमारे एक लाख कर्मचारी कार्यरत आहेत. या संख्येत टेस्लाच्या उपकंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या बातम्यांदरम्यान, टेस्लाचे शेअर्स शुक्रवारी 66 ने घसरून 709 वर आले. दोन महिन्यांपूर्वीपर्यंत कंपनीचे समभाग 1,150 च्या आसपास व्यवहार करत होते.

टेस्ला कारच्याही तक्रारी होत्या

दरम्यान, यूएस सरकारच्या नियामकांनी शुक्रवारी सांगितले की 750 हून अधिक टेस्ला वाहन मालकांनी कारबद्दल तक्रारी केल्या आहेत. ग्राहकांचे म्हणणे आहे की अर्धवट स्वयंचलित ड्रायव्हिंग सिस्टीमवर (Automatic Driving System) चालणाऱ्या कार कोणत्याही उघड कारणाशिवाय अचानक आपोआप बंद पडत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

SCROLL FOR NEXT