Electricity Bill Dainik Gomantak
अर्थविश्व

Electricity Bill: वीज बिल येईल शून्य; कसं? जाणून घ्या..

जर तुम्ही वीज बिलाने हैराण असाल तर अस एक उपकरण आहे ज्यामधून तुम्हाला एक रूपयाचे पण वीज बिल भरावे लागणार नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

उन्हाळा असो की हिवाळा, प्रत्येक ऋतूत लोकांना विजेची खूप गरज असते. त्यामुळे बहुतांश नागरिक वीजबिलाने (electricity bill) हैराण असतात. घरात अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरली जातात. त्यामुळे वीज मीटरचा वेग खूप वाढतो, त्यामुळे सर्वच लोक वीज बिलाने प्रचंड नाराज होत आहेत. जर तुम्ही तुमच्या वीज बिलाने हैराण असाल तर अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण अस एक उपकरण आहे ज्यामधून तुम्हाला एक रूपयाचे पण वीज बिल भरावे लागणार नाही. विशेष म्हणजे केंद्र सरकारकडूनही या उपकरणाचा प्रचार देखील केला जातो.

  • सोलर लाईटचा फायदा-

सरकारकडूनही सौर ऊर्जेला प्रोत्साहन दिले जात आहे. यासोबतच सौरऊर्जेवर चालणाऱ्या उत्पादनांनाही भरघोस अनुदानाचा लाभ मिळत आहे. अशावेळी असा सोलर लाईट बाजारात आलं आहे. त्यामुळे जर तुम्ही सोलर लाईट वापरला तर हिवाळ्यात तुमचे विजेचे बिल एकदम शून्य येऊ शकते.

  • सोलर लाइट किंमत-

या सोलर लाइटच्या मदतीने घराचे छत, बाग, बाल्कनी यासह अनेक ठिकाणी विजेशिवाय दिवे लावता येतात. या सोलर लाईटचे नाव Hardoll LED वॉटरप्रूफ फेंस सोलर लाईट लॅम्प आहे आणि विशेष बाब म्हणजे याची किंमतही कमी आहे.

  • सोलर लाइटचे वैशिष्ट्य-

सोलर लाइटचे वैशिष्ट्य म्हणजे अंधार पडल्यावर तो आपोआप उजळून निघतो. त्याच वेळी, सूर्यप्रकाश मिळाल्यावर ते आपोआप बंद होते. हा वॉटरप्रूफ आणि प्लॅस्टिकचा सोलर लाइट आहे. तुम्ही ते तुमच्या घरांमध्ये सहज बसवू शकतात. 6 तास चार्ज केल्यानंतर तुम्ही ते 18 तास बर्न करू शकता.

  • वीज मोफत मिळणार-

यासोबतच जर तुम्ही तुमच्या घरात एक मोठा सोलर पॅनल लावला तर लाईटशिवाय तुम्ही तुमच्या घरातील एसी, फ्रीज, कुलर, टीव्ही, मोटार, फॅन यासह सर्व उत्पादने लाईटशिवाय चालवू शकता. असे केल्याने तुम्हाला वीज बिलात एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. तुमच्या घरी सौर पॅनेल बसवण्यासाठी तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाइट www.solarrooftop.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT