Beneficiaries
Beneficiaries Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan EKYC करणं झालं सोपं, घरबसल्या मोबाईलवरुन करता येणार संपूर्ण प्रक्रिया

दैनिक गोमन्तक

How To Complete eKYC: PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता तुम्हाला ई-केवायसीसाठी आधार सेवा केंद्रांमध्ये जाण्याची गरज नाही. जर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधारशी लिंक असेल, तर तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरुन (Laptop) ओटीपीद्वारे घरी बसून ई-केवायसी पूर्ण करु शकता. पीएम किसान (PM Kisan Scheme) पोर्टलवर आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरण काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले होते, जे आता पुनर्संचयित करण्यात आले आहे. याशिवाय बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी तुम्ही जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधू शकता.

31 मे पूर्वी ई-केवायसी पूर्ण करा

देशातील सुमारे 12.50 कोटी शेतकरी पीएम किसानच्या पुढील किंवा 11 व्या हप्त्याची वाट पाहत असतील आणि, जर तुम्ही ई-केवायसी पूर्ण केले नसेल तर 2000 रुपयांचा हप्ता अटकू शकतो. पीएम किसान पोर्टलवर आधार आधारित ई-केवायसी तुम्ही तुमच्या मोबाइल किंवा लॅपटॉपवरुन घरी बसून करु शकता. यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. त्यामुळे पुढचा हप्ता कोणत्याही अडथळ्याशिवाय घ्यायचा असेल तर 31 मे पर्यंत नक्कीच ही प्रक्रिया पूर्ण करा.

याप्रमाणे ई-केवायसी पूर्ण करा

स्टेप्स 1: यासाठी, प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल फोन ब्राउझरच्या क्रोम सारख्या आयकॉनवर टॅप करा आणि तिथे pmkisan.gov.in टाइप करा. आता तुम्हाला पीएम किसान पोर्टलचे होमपेज दिसेल, होमपेजच्या शेवटी जा आणि तुम्हाला ई-केवायसी लिहिलेले दिसेल. यावर टॅप करा आणि तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च करा.

स्टेप 2: आता त्यात आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर 4 अंकी OTP येईल. प्रदान केलेल्या बॉक्समध्ये ते टाइप करा.

स्टेप 3: यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला आधार प्रमाणीकरणासाठी सर्च बटणावर टॅप करण्यास सांगितले जाईल. त्यावर टॅप करा आणि आता तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आणखी 6 अंकी OTP येईल, तो भरा आणि सबमिट वर टॅप करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर eKYC पूर्ण होईल अन्यथा Invalid येईल. असे झाल्यास तुमच्या हप्त्याला उशीर होऊ शकतो. तुम्ही ते आधार सेवा केंद्रावर दुरुस्त करुन घेऊ शकता. जर तुमचे eKYC आधीच पूर्ण झाले असेल तर eKYC आधीच पूर्ण झाले आहे, असा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशात आणखी 12 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.

11वा हप्ता कधी येणार

या योजनेंतर्गत, प्रत्येक आर्थिक वर्षात, मोदी सरकार शेतकऱ्यांना 2000-2000 च्या तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये देते. याअंतर्गत दरवर्षी पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो. जोपर्यंत पुढील हप्ता संबंधित आहे, तो लवकरच तुमच्या खात्यात येईल. कारण राज्य सरकारांनी आरएफटीवर स्वाक्षरी केली आहे. यानंतर FTO जनरेट होईल. मोदी सरकारने (Modi Government) 24 फेब्रुवारी 2019 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली होती आणि ती 1 डिसेंबर 2018 पासून लागू झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT