Aadhar Update

 
Dainik Gomantak
अर्थविश्व

Aadhar Update: आधार कार्डमधील खराब फोटो आता करा सहज अपडेट..

देशातील प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. सर्व सरकारी कामांसाठी आधार कार्ड ही पहिली गरज आहे.

दैनिक गोमन्तक

Aadhar Update: देशातील प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. सर्व सरकारी कामांसाठी आधार कार्ड ही पहिली गरज आहे. बँक खाते उघडण्यासाठी असो किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो, पासपोर्ट काढण्यासाठी असो किंवा एलपीजी सिलिंडरची सबसिडी घेण्यासाठी, जवळपास सर्वत्र आधार क्रमांकाची मागणी केली जाते.

म्हणूनच तुमचे आधार कार्ड (Aadhar Card) नेहमी अपडेट (Update) ठेवणे आणि ते तुमच्या मोबाइल फोन नंबरशी जोडणे महत्त्वाचे आहे.

आधार क्रमांक जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) वेळोवेळी आधार कार्ड वापरणाऱ्या लोकांना मोबाईल क्रमांकासह सर्व माहिती अपडेट करण्यास सांगते.

आधार कार्ड बनवताना अनेक वेळा तुमचा फोटो (Image) खूप खराब येतो तर काही वेळा आधार कार्डमधील फोटो ओळखणे कठीण होते. जर तुमच्या आधार कार्डचा फोटो बरोबर नसेल आणि तुम्हाला ते बदलायचे असेल तर तुम्ही हे काम अगदी सहज करू शकता.

आधार कार्ड मध्ये तुमचा फोटो कसा अपडेट करायचा

  1. सर्व प्रथम तुम्हाला आधार कार्डच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आधार नोंदणी/दुरुस्ती/अपडेट फॉर्म डाउनलोड करावा लागेल. फॉर्म काळजीपूर्वक भरा.

  2. आता तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्या आणि हा फॉर्म सबमिट करा आणि बायोमेट्रिक तपशील द्या.

  3. फॉर्म घेतल्यानंतर, एक्झिक्युटिव्ह तुमचा लाईव्ह फोटो कॅप्चर करेल आणि सिस्टममध्ये अपडेट करेल.

  4. तपशील अपडेट करण्यासाठी तुम्हाला येथे रु.25+जीएसटी शुल्क भरावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT