Digital Payment | Digital payments without the internet Dainik Gomantak
अर्थविश्व

Internet नाही! 'या' पद्धतीने करा डिजिटल पेमेंट

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे UPI 123 पे सेवा सुरू केल्या असून देशातील सुमारे 400 दशलक्ष फीचर फोन वापरकर्ते डिजिटल पेमेंट प्रणालीशी जोडले जातील

दैनिक गोमन्तक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI)द्वारे UPI 123 पे सेवा सुरू केल्यामुळे, देशातील सुमारे 400 दशलक्ष फीचर फोन वापरकर्ते डिजिटल पेमेंट प्रणालीशी जोडले जातील. या फीचर फोन वापरकर्त्याला इंटरनेटशिवाय डिजिटल पेमेंट करता येणार आहे. आरबीआयचे हा निर्णय डिजिटल पेमेंटच्या जगात एक क्रांतिकारी निर्णय मानला जात आहे. (How to make Digital payments without the internet)

डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर म्हणतात की, सध्या फिचर फोन वाप्रकर्त्यासाठी युपीआय सेवा USSD आधारावर उपलब्ध आहेत, परंतु त्या खूपच त्रासदायक असून सर्व मोबाइल ऑपरेटर अशा सेवाना परवानगी देत नाहीत.

* फीचर फोनद्वारे पेमेंट करण्याच्या पद्धती

1) IVR: IVR म्हणजेच इंटरएक्टिव्ह व्हॉइस रीस्पॉन्स अंतर्गत वापरकर्त्यांला विशिष्ट क्रमांकावर कॉल करून पेमेंट करण्याची सुविधा मिळेल. हा क्रमांक NPCI द्वारे प्रदान केला जाईल.

2) अॅप: या अंतर्गत UPIपेमेंटसाठी फीचर फोनमध्ये एक अॅप स्थापित केले जाईल. स्कॅन आमो पेमेंट फीचर वगळता सर्व प्रकारचे व्यवहार या अॅपद्वारे करता येतात.

3) व्हाॅईस: फीचर फोन वापरकर्ते प्रॉक्सिमिटी व्हाॅईस आधारित पेमेंट करू शकतील. हे कोणत्याही डिव्हाईसवर संपर्करहित, ऑफलाइन आणि प्रॉक्सिमिटी डेटा कम्युनिकेशन सक्षम करण्यासाठी व्हाॅईसचा वापर करू शकता.

4) मिस्ड कॉल: या फीचर फोनमध्ये युजरला पैसे घेणाऱ्याच्या नंबरबवर मिस्ड कॉल द्यावा लागतो. त्यानंतर पैसे भरण्यासाठी परत कॉल करावा. या कॉलवर पैसे देणाऱ्याला UPI पिनची तपासणी करावी लागेल.

* UPI पिन बनवावा

फीचर फोन वापरकर्त्यांना इंटरनेटशिवाय पेमेंट करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यातून UPIपिन तयार करणे गरजेचे आहे. बँकेच्या शाखेत जाऊन हा पिन तयार केला जाऊ शकतो. यानंतर पेमेंटच्या वेळी आवश्यक असल्यास युजर्सला हा UPI पिनचा वापर करावा लागेल.

* तुम्ही हेल्पलाईनची मदत घेऊ शकता

आरबीआयने फीचर फोनद्वारे डिजिटल पेमेंटसाठी हेल्पलाईनही सुरू केली आहे. या हेल्पलाईनलाडिजिटलसाठी असे नाव देण्यात आले आहे. फीचरफोन वापरकर्ते digishathi. com वर किंवा फोन नंबर 14431 आणि 1800 891 3333 द्वारे कोणत्याही अडचणी विचारू शकतात. ही हेल्पलाईन नॅशनल पेमेंटस् कार्पोरेशन ऊफ इंडियाने (NPCI) तयार केली आहे.

* देय रक्कम उघड केली नाही

युजर्स UPI वर आधारित विद्यमान USSD प्रणालीद्वारे जास्तीत जास्त 2000 हजार रुपये पाठवू शकतो. तथापि, RBI ने नवीन पर्यायातर्गत इंटेरनेटशिवाय डिजिटल पेमेंट रकमेची मर्यादा उघड केलेली नाही.

* फीचर फोन काय आहे

या फोनद्वारे तुम्ही कॉल, मॅसेज सेंड आणि रिसिव्ह करू शकता. एका अंदाजानुसार आजही देशातील मोठी लोकसंख्या फीचर फोनचा वापर करतात.

* इंटरनेटशिवाय पेमेंट कराची पद्धत

* सर्वात पहिले फोनच्या कीपडवरुण *99# टाइप करून कॉल करावा लागेल.

*यानंतर मोबाइलवर अनेक पर्याय दिसतील. सर्व प्रथम पैसे पाठवण्याचा पर्याय आहे. यास्तही तुम्हाला 1 दयाळ करावा लागेल.

* यानंतर पैसे कुठे कसे पाठवायचे यांची माहिती मागवली जाते. यामध्ये मोबाइल नंबर, UPI आयडी आणि IFSC पर्याय निवडावा.

*पैसे पाठवण्याचा पर्याय निवडल्यानंतर, सेंड या बटणावर क्लिक करावे.

* यानंतर पाठवायची रक्कम सबमीत केल्यानंतर, सेंड बटन दाबावे लागेल. एक टिप्पणी देखील प्रविष्ट करणे आवश्यक आहे. यानंतर UPI पिन विंचरला जातो. UPI पिन टाकल्यानंतर पेमेंट केल जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT