पीएम आवास योजनेचे पैसे आले? कसे तपासाल?

देशातील निम्नवर्गीय आणि मध्यमवर्गीयांना घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार प्रधानमंत्री आवास योजना राबवत असते.
PM Awas Yojana
PM Awas YojanaDainik Gomantak
Published on
Updated on

देशातील निम्नवर्गीय आणि मध्यमवर्गीयांना घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार (Central Government) प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana) राबवत असते. या योजने अंतर्गत सरकार घर बांधणाऱ्याला सबसिडी देते. देशातील अनेक कुटुंबांना घरे उभारण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेंतर्गत प्रथमच घर खरेदी करण्यासाठी सरकारकडून 2.67 लाख रुपयांची सबसिडी देखील दिली जाते. (PM Awas Yojana money check whether you got it or not)

PM Awas Yojana
Government Scheme: तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी घ्या 'या' सरकारी योजनेचा लाभ

अशी अनेक कुटुंबे आहेत जी या योजनेच्या अटींचे पूर्णपणे पालन करत असतात. पीएम आवास योजनेसाठी अर्ज केला, मात्र आजपर्यंत त्यांच्या खात्यात अनुदान आलेले नाहीये. ज्यांनी पीएम आवास योजनेसाठी अर्ज केले आहेत, परंतु अद्यापपर्यंत त्यांना अनुदानाचे पैसे मिळालेले मिळाले नाहीत. अशा परिस्थितीत सबसिडी कुठे अडकली आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.

सबसिडी तपासता येते

अर्ज करताना चुकीची माहिती फॉर्ममध्ये टाकल्याचे अनेकदा दिसून आले. त्यामुळे शासनाकडून मिळणारे अनुदान रखडत राहते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट ही आहे की, जो अर्ज करत असेल त्यांनी पहिल्यांदाच घर खरेदी करायला हवे. जर तुम्ही ही अट पूर्ण केली नाही तर तुम्हाला लाभ मिळणार नाहीये. त्याचबरोबर पीएम आवास योजनेंतर्गत सबसिडी मिळवण्यासाठी सरकारने उत्पन्नानुसार तीन श्रेणी तयार केल्या आहेत. ज्यामध्ये वार्षिक 3 लाख रुपये, वार्षिक 6 लाख रुपये आणि वार्षिक 12 लाख रुपये उत्पन्नाच्या तीन श्रेणी तयार केल्या गेल्या आहेत.

PM Awas Yojana
Provident Fund: 1 एप्रिलपासून होणार नियमांमध्ये मोठे बदल

अर्जदाराने ज्या वर्गवारीत अर्ज केला आहे आणि त्याचे उत्पन्न आणि वास्तविक उत्पन्न यात तफावत असल्यास त्यांचे अनुदान देखील बंद केले जाते. आधार आणि इतर कागदपत्रांमध्ये फॉर्म भरताना चुका झाल्या तरी योजनेचा लाभ मिळण्यास विलंब होतो.

पैसे कसे आणि कुठे तपासायचे?

सेटल होण्यापूर्वी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmaymis.gov.in/ ला भेट द्यावी लागेल, यानंतर तुम्हाला 'सर्च बेनिफेशियरी' या पर्यायावरती क्लिक करावे लागेल. त्यानंतर Search By Name या पर्यायावरती क्लिक करुन. आता तुम्हाला तुमचे नाव इथे टाकावे लागेल. यानंतर, तुमच्या नावाप्रमाणे अर्ज केलेल्या सर्व लोकांची यादी दिसून येईल. तुम्ही या यादीत तुमचे नाव तपासून पाहु शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com