Money Dainik Gomantak
अर्थविश्व

DA Hike: तोहफा, तोहफा, तोहफा! केजरीवाल सरकारची सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

DA Hike Delhi Government: दिवाळीपूर्वी दिल्ली सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे.

दैनिक गोमन्तक

DA Hike: दिवाळीपूर्वी दिल्ली सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. दिल्ली सरकारच्या बैठकीत डीए म्हणजेच महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने आपल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ जाहीर केली आहे.

शासन आदेश जारी

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना (Employees) दिवाळीपूर्वी देण्यात येणाऱ्या या महागाई भत्त्याबाबत दिल्ली सरकारने आदेश जारी केला आहे. एका अधिकृत आदेशानुसार, दिल्लीच्या वित्त विभागानेही केंद्र सरकारच्या सुधारित दरांनुसार महागाई (Inflation) भत्त्यात वाढीचा तपशील आपापल्या विभागांना आणि स्वायत्त संस्थांना पाठवला आहे.

कर्नाटकने चांगली बातमी दिली होती

यापूर्वी, कर्नाटक (Karnataka) सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ केली होती. नुकतेच बोम्मई सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3.75 टक्के वाढ मंजूर करण्यात आली आहे. सध्या कर्नाटक सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराच्या 27.25 टक्के महागाई भत्ता मिळतो, तो आता वाढून 31 टक्के इतका झाला आहे.

केंद्राने गेल्या महिन्यात निर्णय घेतला

गेल्या महिन्यात 28 सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्राचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 4 टक्के महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले होते की, 'केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 जुलै 2022 पासून वाढीव DA आणि DR च्या रकमेचा लाभ मिळेल.'

त्याच वेळी, सरकारच्या आदेशानुसार, या अंतर्गत केंद्राचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी (7 व्या वेतन आयोगाच्या ताज्या बातम्या) चार टक्के दराने महागाई भत्ता (DA Hike News) आणि मदतीचा हप्ता जारी केला जाईल. या बाबीमुळे केंद्रीय तिजोरीवर दरवर्षी 12,852 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल.

अशोक गेहलोत सरकारनेही महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली

ज्याप्रमाणे केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती. त्याच दिवशी अशोक गेहलोत सरकारनेही कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ मंजूर केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT