Electricity Meter Dainik Gomantak
अर्थविश्व

Free Electricity: मोफत वीज हवी असेल, तर हे काम लगेच करा; बिलाचे पैसे देणार सरकार !

Electricity Bill: घरामध्ये मोफत वीज उपलब्ध झाली तर अनेकांना दिलासा मिळतो.

दैनिक गोमन्तक

Electricity Bill: घरामध्ये मोफत वीज उपलब्ध झाली तर अनेकांना दिलासा मिळतो. देशात दररोज मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो. आजच्या काळात विजेशिवाय जगणे फार कठीण आहे. अशा परिस्थितीत सरकारने मोफत वीज उपलब्ध करुन दिली तर जनतेचे बजेटही खूप सुधारु शकते. त्याच वेळी, आता दिल्ली सरकारने वीज सबसिडीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे.

तारीख वाढवली

दिल्ली सरकार (Delhi Government) अनेक दिवसांपासून लोकांना मोफत वीज देत आहे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, "दिल्लीतील मोफत वीज योजनेसाठी नोंदणीची अंतिम तारीख आता 15 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे, 15 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करणाऱ्या दिल्लीकरांना मोफत वीज योजनेचा लाभ मिळत राहील." ते पुढे म्हणाले की, 'दिल्लीतील (Delhi) सुमारे 35 लाख कुटुंबांनी अनुदानित वीज योजनेसाठी नोंदणी केली आहे.'

वीज बिलावर सबसिडी

दिल्लीत विजेवर सबसिडी मिळवण्यासाठी एक नवीन स्वैच्छिक सब्सिडी योजना (VSS) आहे. दिल्ली सरकारने 2019 मध्ये मोफत वीज योजना सुरु केली होती. या योजनेंतर्गत दिल्लीतील रहिवाशांना 200 युनिटपेक्षा कमी वीज वापरासाठी 100 टक्के सबसिडी आणि 400 युनिटपर्यंत वीज वापरण्यासाठी 800 रुपयांपर्यंत 50 टक्के सबसिडी (Subsidy) मिळत होती.

अर्ज करणे आवश्यक

त्याच वेळी, आता राज्य सरकारने एक नवीन स्वयंसेवी अनुदान योजना (VSS) सुरु केली आहे, ज्यामध्ये लोकांना अनुदानित दरात वीज मिळणे सुरु ठेवण्यासाठी सबसिडीची निवड करणे अनिवार्य आहे, म्हणजे डीफॉल्टनुसार वीज सबसिडी मिळणार नाही, यासाठी ग्राहकांना अर्ज करावा लागेल.

मिस्ड कॉलद्वारे नोंदणी करा

रहिवासी 70113111111 वर मिस्ड कॉल देऊ शकतात. त्यांना एसएमएसद्वारे सबसिडीची निवड करण्यासाठी लिंक मिळेल. पुढील चरणात ते लिंकवर क्लिक करु शकतात आणि ते त्यांना WhatsApp च्या पेजवर पुनर्निर्देशित करेल. त्यांना त्यांचा सीए क्रमांक टाकावा लागेल जो विजेच्या स्वरुपात उपलब्ध आहे. ते आधी भरलेला सबसिडी अर्ज स्क्रीनवर पाहू शकतात. त्यानंतर, त्यांना वीज सबसिडी निवडण्यासाठी 'होय' पर्याय निवडून तपशीलांची पुष्टी करावी लागेल. शेवटच्या टप्प्यात, त्यांना WhatsApp द्वारे त्यांच्या Acknowledgment Message मिळेल.

WhatsApp द्वारे वीज सबसिडीसाठी अर्ज कसा करावा

ग्राहकांना WhatsApp क्रमांक 70113111111 वर 'हाय' पाठवावे लागेल. त्यांना 11 अंकी CA क्रमांक टाकावा लागेल. आधीच भरलेला अर्ज स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर, ग्राहकांना विजेवर सबसिडी निवडण्यासाठी 'होय' पर्याय निवडून तपशीलांची पुष्टी करावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT