Arvind Kejriwal
Arvind Kejriwal  Dainik Gomantak
अर्थविश्व

Arvind Kejriwal Big Announcement: बेरोजगार मजुरांना मोठा दिलासा, दिल्ली सरकार देणार 5 हजार रुपये

दैनिक गोमन्तक

Arvind Kejriwal Big Announcement: दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत ग्रॅप स्टेज 3 चे नियम लागू करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत दिल्लीतील बांधकामे बंद करण्यात आली आहेत. अचानक बांधकामे बंद झाल्याने हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी मोठी घोषणा केली. अशा बांधकाम साइटवर काम करणाऱ्या मजुरांना 5000 रुपयांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली आहे.

कामगार मंत्र्यांना दिल्या सूचना

वृत्तानुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी कामगार मंत्री मनीष सिसोदिया यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यांनी मनीष सिसोदिया यांना सांगितले की, जोपर्यंत बांधकाम पुन्हा सुरु होत नाही, तोपर्यंत या मजुरांना दरमहा 5 हजार रुपये दिले जावेत.

नुकताच GRAP चा तिसरा टप्पा कार्यान्वित झाला

दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi-NCR) हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत चालली आहे. येथील वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) सातत्याने वाढत आहे. वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशन (CAQM) ने चार दिवसांपूर्वी काही प्रकल्प वगळता संपूर्ण दिल्ली-NCR मध्ये बांधकाम आणि पाडण्याच्या क्रियाकलापांवर बंदी घातली होती. तिसऱ्या टप्प्यात बांधकामांवर बंदी घालण्यात आली.

केवळ अत्यावश्यक प्रकल्पांना परवानगी

तिसऱ्या टप्प्यातर्गंत, अत्यावश्यक प्रकल्प (जसे की रेल्वे, मेट्रो, विमानतळ, ISBT, राष्ट्रीय सुरक्षा/राष्ट्रीय महत्त्वाच्या संरक्षणाशी संबंधित प्रकल्प) वगळता, NCR मध्ये बांधकाम आणि पाडण्याच्या क्रियाकलापांवर कठोर निर्बंध लादण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.

सीएक्यूएमने म्हटले की, दिल्ली-एनसीआरमध्ये, राज्य सरकार तिसऱ्या टप्प्यात बीएस III पेट्रोल आणि बीएस IV डिझेल चारचाकी वाहनांवर बंदी घालू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

सोन्या-चांदीने रचला मोठा रेकॉर्ड; सोन्याने पार केला 74 हजारांचा टप्पा!

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT