आज मार्केटमध्ये जवळपास साऱ्याच प्रमुख क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) तेजीत असल्याचे दिसून येत आहेत . जागतिक क्रिप्टोकरन्सी बाजार भांडवल सध्या 1.9 ट्रिलियन डॉलरवर आहे, जे मागच्या 24 तासांमध्ये 3.69 टक्क्यांनी वाढले आहे.गेल्या 24 तासांमध्ये क्रिप्टोकरन्सी मार्केटचा एकूण व्हॉल्यूम 91.84 अब्ज डॉलर झाला आहे,यात मात्र 0.07 टक्क्यांनी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे .(Cryptocurrency is on high, Bitcoin cross 33 lakh)
बिटकॉइन या सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सीचा विचार करता मार्केटमध्ये बिटकॉइनची किंमत सध्या 33.5 लाख रुपये आहे आणि बाजारात याचे वर्चस्व 42.56 टक्के आहे, ज्यात दिवसभरात 0.09 टक्के वाढ झाली आहे.
स्वित्झर्लंडच्या आर्थिक बाजाराच्या पर्यवेक्षकांनी 29 सप्टेंबर रोजी सांगितले होते की त्यांनी देशातील पहिला फंड मंजूर केला आहे जो प्रामुख्याने क्रिप्टो मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतो, असे रॉयटर्सने आपल्या एका वृत्तात सांगितले आहे. तर दुसरीकडे क्रिप्टो मार्केट इंडेक्स फंड हा पात्र गुंतवणूकदारांसाठी मर्यादित आहे आणि विशिष्ट जोखमीसह "पर्यायी गुंतवणुकीसाठी इतर निधी" अंतर्गत वर्गीकृत आहे, स्विस फायनान्शियल मार्केट सुपरवायझरी अथॉरिटी (FINMA) ने एका निवेदनात म्हटले आहे.
क्रिप्टोकरन्सी मालमत्ता ब्लॉकचेन किंवा वितरित लेजर तंत्रज्ञानावर आधारित आहेत.
FINMA सातत्याने तंत्रज्ञाना सुलभ आणि मोठ्या मार्गाने वापर करण्यासाठी वित्तीय बाजार कायद्यातील विद्यमान तरतुदी लागू करत आहे आणि यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर विद्यमान नियमांना अडथळा आणण्यासाठी केला जात नाही याची खात्री करता येईल.
30 सप्टेंबर रोजी सकाळी 7.20 पर्यंत क्रिप्टोकरन्सीच्या किंमती खालील प्रमाणे होत्या
Name - Price (INR)
Bitcoin - 33,51,001
Ethereum - 2,31,780
Tethe - 78.62
Cardano - 166.28
Binance Coin - 29,500.00
XRP - 74.60
Solana - 10,898.89
Polkadot - 2,219.99
Dogeecoin - 15.8589
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.