भारतात 2024 च्या अखेरीस लॉन्च झालेल्या मध्यम आकाराच्या एसयूव्ही एमजी विंडसर ईव्हीने (SUV MG Windsor EV) धुमाकूळ घातला आहे. ही इलेक्ट्रिक कार ग्राहकांना तिच्या फीचर्स आणि रेंजमुळे चांगलीच पसंद पडत आहे. एवढचं नाहीतर तिच्यासोबत येणाऱ्या बॅटरीवरील लाइफटाइम वॉरंटीमुळेही ग्राहक (Customer) चिंतामुक्त झाले आहेत. याचा सकारात्मक परिणाम असा झाला की, ती भारतातील सर्वाधिक वेगाने विकली जाणारी इलेक्ट्रिक कार बनली. 6 महिन्यांत 20 हजारांहून अधिक लोकांनी ती खरेदी केले.
विंडसर ईव्ही खरेदी करणाऱ्यांना कंपनी लाइफटाइम बॅटरी वॉरंटी देत आहे. याचा अर्थ असा की, जोपर्यंत वाहन चांगल्या स्थितीत आहे, तोपर्यंत बॅटरी खराब झाल्यास ती दुरुस्त करता येते. तथापि, ही वॉरंटी फक्त कारच्या पहिल्या मालकालाच उपलब्ध असेल. जर एखाद्या ग्राहकाने गाडी दुसऱ्याला विकली तर दुसऱ्या मालकाला 8 वर्षांची किंवा 1,60,000 किलोमीटरची वॉरंटी मिळेल. तथापि, कारची वॉरंटी फक्त 3 वर्षांसाठी दिली जात आहे.
एमजी विंडसर ईव्हीची किंमत निवडलेल्या व्हेरिएंटनुसार, 15.01 ते 17.09 लाख रुपयांपर्यंत दिल्लीत विकली जात आहे. एक्साईट, एक्सक्लुझिव्ह आणि एसेन्स अशा 3 वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये ही कार उपलब्ध आहे. विंडसर ईव्ही 38 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅकसह उपलब्ध असून तिची रेंज 331 किमी आहे. मोटर पुढच्या चाकांना पॉवर देते. पॉवर आउटपुट 134bhp/200Nm इतके आहे. यात इको, इको+ नॉर्मल आणि स्पोर्ट असे ड्रायव्हिंग मोड आहेत. विंडसर ईव्ही टाटा नेक्सॉन ईव्ही, महिंद्रा एक्सयूव्ही400 आणि ह्युंदाई क्रेटा ईव्हीशी स्पर्धा करते.
नवीन विंडसरची डिझाइन अतिशय आधुनिक आहे. यात स्प्लिट हेडलॅम्प सेटअप, ए-पिलर-माउंटेड ORVM, फ्लश-फिटिंग डोअर हँडल, अलॉय व्हील्स, इंटिग्रेटेड स्पॉयलर, रिअर बंपर-माउंटेड नंबर प्लेट होल्डर आणि डाव्या फ्रंट फेंडरवर चार्जिंग पोर्ट आहे. कारच्या आतील भागात 15.6-इंचाची फ्रीस्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, हॉरिजॉन्टल माउंटेड AC वेंट, ड्युअल-टोन अपहोल्स्ट्री, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रियर एसी व्हेंट्स आणि तीन-स्पोक मल्टीफंक्शन स्टीअरिंग व्हील आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.