Weird Taxes Dainik Gomantak
अर्थविश्व

Weird Taxes: स्तन झाकण्यापासून सेक्सपर्यंत 'या' भयानक टॅक्सबद्दल तुम्हाला माहिती का?

Budget 2023: नरेंद्र मोदी सरकार 1 फेब्रुवारी रोजी 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे.

दैनिक गोमन्तक

Budget 2023: नरेंद्र मोदी सरकार 1 फेब्रुवारी रोजी 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. 9 वर्षांनंतर सरकार करदात्यांना दिलासा देईल, अशी अपेक्षा आहे. बरं, काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार आणि दिलासा मिळणार की नाही, हे 1 फेब्रुवारीलाच कळणार आहे. पण आज आम्‍ही तुम्‍हाला अशा करांबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल जाणून तुम्‍ही हैराण व्हाल.

दरम्यान, तुम्हाला माहिती आहे का की, एकेकाळी स्त्रियांचे स्तन झाकण्यावर कर होता, तोही भारतात. याशिवाय दाढी ठेवण्यासाठीही लोकांना कर भरावा लागत होता. मिळालेल्या माहितीनुसार, आता न्यूझीलंडमध्ये (New Zealand) गायींच्या ढेकर देण्यावर कर लावला जाऊ शकतो. आता जाणून घ्या जगातील विचित्र करांबद्दल...

खिडक्यांवर कर

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, इंग्लंड (England) आणि वेल्सचा राजा विल्यम्स तिसरा याने 1696 मध्ये खिडक्यांवर कर लावला होता. किंबहुना राजाच्या तिजोरीत एक पैसाही नव्हता, म्हणून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा कर लावण्यात आला होता. खरे तर खिडक्यांवरही त्यांच्या संख्येनुसार कर भरावा लागत होता. ज्या लोकांच्या घरात 10 पेक्षा जास्त खिडक्या होत्या ते 10 शिलिंग पर्यंत कर भरत असत. 1851 मध्ये हा कर रद्द करण्यात आला.

दाढीवर कर

आठवा हेन्री हा इंग्लंडचा दुसरा राजा होता. 1535 मध्ये त्याने दाढी ठेवण्यावर कर लावला होता. व्यक्तीच्या वारसानुसार त्याच्याकडून कर वसूल केला जात असे. हेन्रीच्या मृत्यूनंतर त्याची मुलगी एलिझाबेथ प्रथम हिने दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ दाढी ठेवण्याचा आदेश जारी केला होता. 1698 मध्ये रशियाचा राजा पीटर द ग्रेट यानेही दाढी ठेवण्यावर कर लावला होता.

सेक्स वर टॅक्स

1971 साली अमेरिकेच्या र्‍होड आयलंडची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होती. अशा स्थितीत डेमॉक्रॅटिक स्टेट लेजिस्टेटरने शारीरिक संबंधांवर दोन डॉलरचा कर लावण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण तो कधीच अमलात आला नाही. दुसरीकडे, वेश्याव्यवसाय जर्मनीमध्ये कायदेशीर आहे. तिथे 2004 मध्ये एका कायद्यानुसार वेश्यांना 150 युरो टॅक्स म्हणून भरावे लागत होता.

स्तन झाकण्यावर कर

केरळमधील त्रावणकोरच्या राजाने दुय्यम जातीतील महिलांचे स्तन झाकण्यावर हा कर लावला होता. यामध्ये नाडर, इजवा, ठिय्या आणि दलित महिला यायच्या. जर या महिलांनी आपले स्तन झाकले तर त्यांना कर भरावा लागत असे. तेव्हा नांगेली नावाच्या महिलेने कर भरण्यास नकार दिला. निषेध म्हणून तिने आपले स्तन कापून टाकले. नंतर तिचा मृत्यू झाला. अखेर राजाला कर रद्द करण्यास भाग पाडले गेले.

तसेच, न्यूझीलंडमध्ये गुरांनी ढेकर दिल्यास शेतकऱ्यांना कर भरावा लागेल. वास्तविक, ग्रीन हाऊस गॅसेसची समस्या टाळण्यासाठी सरकारने ही कारवाई केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Glowing Trees Goa: अद्भुत! गर्द काळोखात, गोव्याच्या घनदाट जंगलात 'चमकणारी झाडे'

Congress: काँग्रेसच्या यशात 'संविधान वाचवा'चा वाटा, पण डॉ. आंबेडकरांशी असलेले तणावपूर्ण संबंध विसरता येईल का?

Tesla Showroom In Mumbai: इलॉन मस्कच्या 'टेस्ला' कंपनीचं मुंबईत जय महाराष्ट्र! वांद्रे-कुर्ला संकुलात भारतातलं पहिलं शो रूम सुरू

Comunidade Land: कोमुनिदाद जमिनी लाटू नका! अन्यथा गावकारी संपेल, भूमिपुत्र संपतील, पर्यायाने गोंयकारांसह गोवाही संपेल...

School Bag: दप्तराच्या ओझ्याखाली दबलेला विद्यार्थी 'प्रसन्न' नसेल तर त्याला अभ्यास कसा पेलवेल?

SCROLL FOR NEXT