Indian Racing Festival 2026: गोव्यात रंगणार 'इंडियन रेसिंग फेस्टिव्हल'चा थरार, CM प्रमोद सावंतांनी पोस्ट करत दिली माहिती

Indian Racing Festival 2026 In Goa: निसर्गरम्य किनारे आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याची ओळख आता जागतिक 'स्पोर्ट्स हब' म्हणून होणार आहे.
Indian Racing Festival 2026 In Goa
Indian Racing Festival 2026 In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: निसर्गरम्य किनारे आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याची ओळख आता जागतिक 'स्पोर्ट्स हब' म्हणून होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येत्या १४ आणि १५ फेब्रुवारी २०२६ रोजी गोव्यात 'इंडियन रेसिंग फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात खास तयार करण्यात आलेल्या 'गोवा स्ट्रीट सर्किट'वर हा हाय-स्पीड थरार रंगणार आहे.

हा भव्य क्रीडा महोत्सव 'रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेड' (RPPL) आणि 'एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा' (ESG) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जात आहे.

विशेष म्हणजे, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीजवळ असणारे हे स्ट्रीट सर्किट जगभरातील रेसिंग प्रेमींचे लक्ष वेधून घेणार आहे. गोव्याला केवळ पर्यटनापुरते मर्यादित न ठेवता, मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषवणारे राज्य म्हणून विकसित करण्याचा सरकारचा मानस आहे.

Indian Racing Festival 2026 In Goa
Goa Crime: चोरीसाठी महिलेच्या जिवावर उठला चोर! थरारक घटनेनंतर मडगाव पोलिसांची मोठी कारवाई; संशयिताच्या आवळल्या मुसक्या

या महोत्सवामुळे गोव्याच्या 'स्पोर्ट्स टुरिझम'ला (Sports Tourism) मोठी गती मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या या आयोजनामुळे जगभरातील पर्यटक आणि मोटरस्पोर्ट्स प्रेमी गोव्यात दाखल होतील.

यामुळे केवळ हॉटेल आणि टॅक्सी व्यवसायालाच नव्हे, तर स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल. मुख्यमंत्री सावंत यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, या कार्यक्रमामुळे स्थानिक युवकांना प्रेरणा मिळेल आणि त्यांना मोटरस्पोर्ट्सच्या क्षेत्रात करिअर करण्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

Indian Racing Festival 2026 In Goa
Goa Winter Session 2026: 'बर्च फायर'चा तपास CBI कडे सोपवा! "सरपंच, सचिवावर कारवाई, मग संबंधित मंत्र्यांना अभय का?" युरींनी सरकारला धरलं धारेवर

"आम्हाला इंडियन रेसिंग फेस्टिव्हल गोव्यात आणताना अत्यंत अभिमान वाटत आहे. हा कार्यक्रम म्हणजे गोव्याला जागतिक क्रीडा नकाशावर नेण्यासाठी टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे," असे मुख्यमंत्री सावंत यांनी नमूद केले.

त्यांनी देशभरातील मोटरस्पोर्ट्स प्रेमींना या रोमहर्षक अनुभवासाठी गोव्याला भेट देण्याचे आवाहन केले आहे. वेग, साहसी क्रीडा प्रकार आणि गोव्याचे आदरातिथ्य असा त्रिवेणी संगम या दोन दिवसांत पाहायला मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com