"एक आठवड्यात 10 कोटी दे नाहीतर तुला..." प्रसिध्द गायकाला 'लॉरेन्स बिश्नोई गँग'कडून धमकी, मनोरंजन विश्वात खळबळ

B Praak Receives Threats From The Lawrence Bishnoi Gang: भारतीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध गायक बी प्राक यांना कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
B Praak Receives Threats From The Lawrence Bishnoi Gang
B Praak Receives Threats From The Lawrence Bishnoi GangDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध गायक बी प्राक (B Praak) याला कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. परदेशातून आलेल्या एका फोन कॉल्स आणि व्हॉईस मेसेजद्वारे ही धमकी देण्यात आली असून, एक आठवड्याच्या आत १० कोटी रुपयांची खंडणी देण्याची मागणी करण्यात आली आहे. "पैसे दिले नाही तर मातीत मिळवून टाकू," असा थेट इशारा या धमकीमध्ये देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, बी प्राक यांच्यासोबत काम करणारे गायक दिलनूर यांना सुरुवातीला लक्ष्य करण्यात आले. ५ जानेवारी रोजी त्यांना परदेशातील क्रमांकावरून दोनदा फोन आले होते, मात्र त्यांनी ते उचलले नाहीत.

६ जानेवारीला पुन्हा फोन आल्यावर दिलनूर यांनी संभाषण केले, पण समोरच्या व्यक्तीचा बोलण्याचा सूर विचित्र वाटल्याने त्यांनी फोन कट केला. त्यानंतर काही वेळातच त्यांना एक धक्कादायक व्हॉईस मेसेज प्राप्त झाला.

B Praak Receives Threats From The Lawrence Bishnoi Gang
Goa News: 'कॅश-फॉर-जॉब घोटाळ्यासंबंधित 19 प्रकरणांची चौकशी सुरु...'- CM सावंतांनी स्पष्टच सांगितलं; वाचा दिवसभरातील घडामोडी

'आरजू बिश्नोई'च्या नावाने ऑडिओ क्लिप

धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख आरजू बिश्नोई अशी करून दिली आहे. आरजू हा लॉरेन्स बिश्नोईसाठी काम करतो आणि सध्या तो परदेशातून टोळीच्या कारवाया हाताळत असल्याचे समजते.

व्हॉईस मेसेजमध्ये त्याने म्हटले आहे की, "बी प्राक याला माझा निरोप दे की आम्हाला १० कोटी रुपये हवे आहेत. तुझ्याकडे एक आठवड्याचा वेळ आहे. तू जगातील कोणत्याही देशात गेलास तरी आम्ही तुला सोडणार नाही. जर तू आमच्यासोबत मिळून चाललास तर ठीक, अन्यथा तुला मातीत मिळवून देऊ." या धमकीला गांभीर्याने घेण्याचेही त्याने मेसेजमध्ये बजावले आहे.

B Praak Receives Threats From The Lawrence Bishnoi Gang
Goa Winter Session 2026: 'बर्च फायर'चा तपास CBI कडे सोपवा! "सरपंच, सचिवावर कारवाई, मग संबंधित मंत्र्यांना अभय का?" युरींनी सरकारला धरलं धारेवर

मोहाली पोलिसांत तक्रार आणि सुरक्षा व्यवस्था

या धमकीनंतर घाबरलेल्या दिलनूर यांनी तातडीने ६ जानेवारी रोजी मोहालीच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे (SSP) लेखी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या ऑडिओ क्लिपची आणि ज्या क्रमांकावरून फोन आले होते, त्यांची तांत्रिक तपासणी सुरू केली आहे.

लॉरेन्स बिश्नोई गँगने अलीकडेच दिल्ली आणि आसपासच्या भागात व्यावसायिकांच्या घराबाहेर गोळीबार करून दहशत निर्माण केली आहे, त्यामुळे पोलीस या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घेत आहेत. बी प्राक यांच्या सुरक्षेमध्येही वाढ करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com