Concerned about banking fraud? So read this news once Dainik Gomantak
अर्थविश्व

बँकिंग फ्रॉडची चिंता आहे? तर मग ही बातमी एकदा वाचाच

बँकिंग फ्रॉडला आळा घालण्यासाठी भारतीय स्टेट बँक (SBI) ने लोकांना नेटबँकिंग किंवा मोबाइल बँकिंगसाठी एक स्ट्रॉंग पासवॉर्ड तयार करण्याचा सल्ला दिला आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोनाच्या संकटात बँकिंग फसवणूकीच्या घटनांमध्ये अनेक पटींनी वाढ झाली आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की कोविडमुळे ऑनलाइन (Online) व्यवहारांमध्ये वाढ झाल्यामुळे बँकिंग फसवणूक (Banking Fraud) वाढली आहे. या संकटाना लक्षात घेता, भारतीय स्टेट बँक (SBI) ने लोकांना नेटबँकिंग किंवा मोबाइल बँकिंगसाठी एक मजबूत पासवॉर्ड (Password) तयार करण्याचा सल्ला दिला आहे, जो हॅकर्सना सहजपणे तोंडाने अशक्य आहे. तुमचा पासवॉर्ड आठ प्रकारे मजबूत कसा बनवू शकता हे एसबीआयने (Password) सांगितले आहे.

* बँकिंग हॅकरर्सपासून बचाव करण्यासाठी या आठ पद्धतींचा करावा वापर

* पासवॉर्डमध्ये कॅपिटल आणि स्मॉल अक्षरे वापरावीत, जसे की aBjsEyi पासवॉर्डमध्ये संख्या आणि चिन्हे दोन्ही वापरावे, dhK5Dvc@%

* मजबूत पासवर्ड तयार करण्यासाठी पासवर्ड 8 अक्षरी असावा. जसे की, ah4lK7sBलक्षात ठेवा आपल्या बोलण्यातील शब्द वापरणे टाळावे.

* किबोर्ड वरील सलग नंबरचा वापर करणे टाळावा. जसे की 1234567899 किंवा abcdefgh यासारखे सामान्य पासवर्ड तयार करणे टाळावे.

* हॅकरर्स सहज अंदाज लावू शकतील असे पासवर्ड ठेवणे टाळावे. जसे की तुमचे नाव किंवा जन्मतारीख पासवर्डशी जोडू नये.

पूढील काही दिवस डेटा चोरीचा वाढू शकतो धोका

कोविड महामारीच्या प्रारंभापासून पाच हजाराहून अधिक महामारीशी संबंधित फिशिंग वेबसाइट्स निर्माण झाल्या आहेत. ज्या बनवता पेमेंट ऑफर आणि सवलतीच्या कोविड चाचण्याद्वारे ग्राहकांची माहिती चोरण्यासाठी डिझाईन केल्या आहेत. गेल्या आठवड्यात आणखी एका अहवालात म्हंटले आहे की भारतातील सुमारे 73 टक्के संस्था किंवा कंपन्याना पूढील 12 महिन्यात डेटा चोरीचा धोका आहे. यामुळे तुम्ही स्ट्रॉंग पासवर्ड वापरणे अत्यंत महत्वाचे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्याच्या व्यावसायिकाला 'मिरची' झोंबली! दुबईत निर्यातीच्या नावाखाली 10 लाखांची फसवणूक, पुण्यातील एकावर गुन्हा दाखल

Marathi Official Language: "मराठी राजभाषा झालीच पाहिजे"! डिचोलीत महिलांचा जयजयकार; धालो, फुगडी, दिंडीतून व्यक्त केला निर्धार

बर्च प्रकरणानंतर झारखंडला पळून गेलेला संशयित सापडला, महिन्यानंतर ‘ऑपरेशनल मॅनेजर’ ताब्यात; महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता

Tuyem Hospital: '100 कोटी खर्चून बांधलेले हॉस्पिटल का सुरु नाही'? पेडण्‍यात उद्रेक; तुये इस्पितळ कृती समितीचे साखळी उपोषण

Chimbel Protest: चिंबलवासीयांचा आक्रोश! आमदार, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंचांच्या घरांवर मोर्चा; युनिटी मॉलविरोधात फुंकले रणशिंग

SCROLL FOR NEXT