Gemini|OpenAI API|Synthesia|Google AI search|AI Tools 2024 Dainik Gomantak
अर्थविश्व

AI टूल्सवर भारतीयांचा सर्वात जास्त विश्वास, माणसांपेक्षा AI शी बोलण्यात अधिक रस

Ashutosh Masgaunde

Compared to the rest of the world, 57 percent of Indian consumers are more interested in interacting with AI than humans:

जगातील इतर देशांच्या तुलनेत, 57 टक्के भारतीय ग्राहक मानवांपेक्षा AI शी संवाद साधण्यास अधिक रस दाखवत आहेत. नवीन उत्पादने आणि सेवांबद्दलच्या माहितीसाठी ते AI टूल्सवर सर्वाधिक विश्वास ठेवत आहेत. त्यांचे जागतिक आणि आशिया पॅसिफिक अंदाज अनुक्रमे 39 आणि 48 टक्के आहेत. यामध्ये चॅट जीबीटी, चॅटबॉट इत्यादी कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम साधनांचा समावेश आहे.

Adobe या सॉफ्टवेअर कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. 'स्टेट ऑफ डिजीटल कस्टमर एक्सपेरियन्स' या सर्वेक्षणात भारतीय ग्राहकांचे उत्पादन संबंधित निर्णय, कस्टमर सपोर्ट, रिटर्न, रिफंड व कँसलेशनसंबंधी इत्यादी प्रश्न विचारण्यात आले.

यापैकी सुमारे 39 टक्के ग्राहकांना मानव आणि एआय चॅटबॉट्स या दोघांशी बोलणे आवडते. विशेषत: जेव्हा त्यांना नवीन उत्पादन किंवा सेवेबद्दल माहिती मिळवायची असते.

Adobe India च्या विपणन संचालक अनिंदिता वेलुरी यांनी सांगितले की, जनरेटिव्ह AI मधील प्रगती ग्राहकांसाठी आधीच परिवर्तनकारी आहे. आता ब्रँड्सनीही चांगल्या आणि वैयक्तिक अनुभवांसाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा अशी त्यांची अपेक्षा आहे.

युरोप आणि यूएस मधील ब्रँड्समध्ये आधीपासूनच AI बजेट आणि अंतर्गत वापर धोरणे असण्याची शक्यता दुप्पट आहे. जागतिक स्तरावर 18 टक्क्यांच्या तुलनेत केवळ 15 टक्के लोक ग्राहक अनुभव उपक्रम वाढविण्यासाठी जेनेरिक AI चा लाभ घेत आहेत.

जवळपास 59 टक्के भारतीय त्यांच्या वैयक्तिक माहितीबाबत पारदर्शक नसलेल्या ब्रँडकडून खरेदी करणे थांबवतील. तथापि, 41 टक्के भारतीय ब्रँड्स आज ग्राहक अनुभवाला व्यावसायिक प्राधान्य म्हणून पाहत आहेत.

Adobe च्या अहवालात असेही म्हटले आहे की, भारतीय ग्राहक त्यांच्या वैयक्तिक डेटाच्या जबाबदार आणि नैतिक वापराबद्दल सर्वात जास्त चिंतित आहेत. त्यात असे म्हटले आहे की, 53 टक्के भारतीय ब्रँड पुढील 12 महिन्यांत त्यांची Gen-AI क्षमता सुधारण्यासाठी वचनबद्ध आहेत तर 76 टक्क्यांकडे आधीपासूनच अनुभव वितरणास समर्थन देण्यासाठी Gen-AI पर्याय आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT