PM Modi and Putin
PM Modi and PutinDainik Gomantak

India-Russia: 'फक्त युरोप म्हणजे जग नव्हे', बदलत्या जागतिक व्यवस्थेवर रशियाचा भारताला पाठिंबा

Europe: "आज जग बदलत आहे. पूर्वी केवळ काही देशांना जागतिक महत्त्व मिळायचे आणि ते विशेषतः पाश्चात्य देश होते आणि यामागे एक कारण होते."
Published on

'Europe alone is not the world', Russia's support to India on changing world order:

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी एका निवेदनात बदलत्या जागतिक व्यवस्थेबाबत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या विधानाचे समर्थन केले आहे.

लॅव्हरोव्ह म्हणाले की 'जग हे केवळ युरोप नाही तर यापेक्षा बरेच काही आहे.' लावरोव म्हणाले की, ग्लोबल साउथ आणि ग्लोबल ईस्ट जागतिक मंचावर उदयास येत आहेत.

नुकतेच मॉस्कोमधील प्रिमकोव्ह रीडिंग्ज इंटरनॅशनल फोरममध्ये बोलताना रशियाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की, जगात आज बदल होत आहेत. पूर्वी केवळ काही देशांना जागतिक महत्त्व मिळायचे आणि ते विशेषतः पाश्चात्य देश होते आणि यामागे एक कारण होते.

लॅवरोव्ह म्हणाले की, आज जागतिक स्तरावर नवीन खेळाडू उदयास येत आहेत आणि ग्लोबल साउथ आणि ग्लोबल ईस्ट त्यांच्यामध्ये प्रमुख आहेत आणि त्यांची संख्याही वाढत आहे.

रशियन परराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले की, हे खरोखरच जागतिक बहुमत आहे. आता देश त्यांच्या राष्ट्रीय हितांना प्राधान्य देतात, इतर कोणत्याही देशाच्या हिताला प्राधान्य देत नाहीत.

PM Modi and Putin
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सल्लागारावर ब्रिटनमध्ये Acid Attack

रशिया-युक्रेन युद्धामुळे पाश्चात्य देशांनी रशियावर कडक निर्बंध लादले आहेत. त्याचबरोबर पाश्चिमात्य देश उघडपणे युक्रेनला पाठिंबा देत आहेत. यामुळेच रशियाचे परराष्ट्र मंत्री पाश्चात्य देशांवर निशाणा साधत असतात.

PM Modi and Putin
Video: युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीत असलेल्या हिंगलाज मातेचे मंदिर पाकिस्तानी कोर्टाच्या आदेशानंतर पाडले

नुकतेच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की, युरोपला त्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज आहे ज्यामध्ये युरोपच्या समस्या या जगाच्या समस्या आहेत आणि जगाच्या समस्या युरोपच्या समस्या नाहीत.

वास्तविक, रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयाचा बचाव करताना जयशंकर यांनी हे वक्तव्य केले होते. संभाषणादरम्यान लावरोव यांनी एस जयशंकर यांच्या या विधानाचाही उल्लेख केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com