Goa Petrol-Diesel Price  Dainik Gomantak
अर्थविश्व

Petrol Diesel Prices In Goa: गोव्यात CNG एक रुपयांनी महागला; पेट्रोल - डिझेलचे दर काय आहेत वाचा

Fuel Prices In Goa Today: गोव्यातील पेट्रोल - डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाला असून, सीएनजीच्या दरात एक रुपयांनी वाढ झाली आहे.

Pramod Yadav

पणजी: दोन महिन्यापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. यावेळी तरी केंद्र सरकार इंधनाच्या दरात कपात करेल, अशी अपेक्षा होती पण, तसे काही झाले नाही. यानंतर गोव्याच्या अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला.

सावंत सरकार इंधनावरच्या करात काही कपात करणार का याकडे लक्ष होते पण, तिथेही सर्वसामान्य नागिकांच्या पदरात निराशाच पडली. दरम्यान, गोव्यातील पेट्रोल - डिझेलचे दर स्थिर आहे पण, सीएनजीच्या दरात एक रुपयांनी वाढ झाली आहे.

गोव्यातील पेट्रोल - डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाला असून, सीएनजीच्या दरात एक रुपयांनी वाढ झाली आहे. राज्यात सीएनजी ९१ रुपये प्रति किलो दराने विक्री केला जात होता, पण एक रुपयांची वाढ झाल्याने प्रति किलो मागे नागरिकांना ९२ रुपये मोजावे लागणार आहेत. जाणून घेऊयात राज्यातील पेट्रोल - डिझेलचे दर कसे आहेत.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North  Goa ₹ 97.71

 Panjim ₹ 97.71

South  Goa ₹ 96.31

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North  Goa ₹ 89.47

 Panjim ₹ 89.47

South Goa ₹ 88.08

गोव्यातील आजचे CNG दर खालीलप्रमाणे:

Goa CNG Rate: ₹ 92 प्रति किलो

चार महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये आणि डिझेल ८७.६२ रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल १०३.४४ रुपये आणि डिझेल ८९.९७ रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल १००.७६ रुपये आणि डिझेल ९२.३५ रुपये प्रति लिटर आहे.

– कोलकातामध्ये पेट्रोल १०४.९५ रुपये आणि डिझेल ९१.७६ रुपये प्रति लिटर आहे.

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. नवीन दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर, त्याची किंमत मूळ किमतीच्या जवळजवळ दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती इतक्या जास्त असण्याचे हेच कारण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

SCROLL FOR NEXT