cng price increased petrol diesel rates today 7 april 2022 cng rates hike rs 3 per kg check latest fuel price  Dainik Gomantak
अर्थविश्व

CNG चे दर आज पुन्हा 2.5 रुपयांनी वाढले

एका आठवड्यात आतापर्यंत सीएनजीवर 9.10 रुपयांची वाढ

दैनिक गोमन्तक

जनतेला गुरुवारी पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. आज सीएनजीच्या दरात किलोमागे अडीच रुपयांनी वाढ झाली आहे. एका आठवड्यात आतापर्यंत सीएनजीवर 9.10 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

मात्र, गुरुवारी पेट्रोल-डिझेलवर नागरिकांना दिलासा मिळाला. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही. गेल्या 17 दिवसांत पेट्रोल 10 रुपयांनी महाग झाल्याची माहिती आहे. अनेक दिवसांपासून प्रतिलिटर 80 पैशांची वाढ होत आहे.

आदल्या दिवशीही सीएनजीच्या (CNG) दरात किलोमागे 2.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आज 2.5 रुपयांनी वाढल्यानंतर दिल्लीत सीएनजीची किंमत 69.11 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे, तर नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये 71.67 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर, मेरठ आणि शामलीमध्ये सीएनजी 76.34 रुपयांना विकला जात आहे. गुरुग्राममध्ये सीएनजीची किंमत आज 77.44 रुपये प्रति किलो झाली आहे. त्याचवेळी रेवाडीमध्ये आज सीएनजी 79.57 रुपयांना मिळत आहे.

आजपासून कर्नाल आणि कैथलमध्ये सीएनजी 77.77 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. कानपूर, हमीरपूर आणि फतेहपूरबद्दल बोलायचे झाले तर सीएनजीचे दर 3 रुपयांनी वाढल्यानंतर 80.90 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. राजस्थानच्या अजमेर, पाली आणि राजसमंदमध्ये सीएनजीचा दर 79.38 रुपये प्रति किलो झाला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज वाढ झालेली नाही

आज पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे दर न वाढवल्यामुळे दिल्लीसह सर्व महानगरांमध्ये दरात बदल झालेला नाही. राजधानी दिल्लीत आज पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 104.77 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.

तेलाच्या किमती दररोज अपडेट केल्या जातात

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज अपडेट केली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: कौटुंबिक वादातून चुलत भावाचा प्राणघातक हल्ला, 23 वर्षीय तरुण गंभीर जखमी; काणकोणातील धक्कादायक घटनेने खळबळ

Labh Drishti Yog 2026: शुक्र-शनीचा 'लाभ दृष्टी योग'! 15 जानेवारीपासून पालटणार 'या' 5 राशींचे नशीब; धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे संकेत

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाच्या पराभवाचा खरा विलन कोण? कर्णधार आयुष म्हात्रेची 'ती' चूक भारताला पडली महागात!

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाचे स्वप्न भंगले! पाकिस्ताने भारताला 191 धावांनी नमवत उंचावला विजयाचा 'चषक' VIDEO

VIDEO: बापरे! ट्रकखाली जाता जाता वाचला... तरुणांचा जीवघेणा थरार व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ओढले ताशेरे

SCROLL FOR NEXT