Indian Railways
Indian Railways Dainik Gomantak
अर्थविश्व

भारतीय रेल्वेच्या मार्गात आणि वेळेत बदल; जाणून घ्या नवे वेळापत्रक

दैनिक गोमन्तक

भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) उत्तर रेल्वे (Northern Railway) झोनने प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी दिल्ली आणि हरियाणातील रेवाडी दरम्यान दररोज धावणारी अनारक्षित मेल ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. याआधी ही ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावत होती. याशिवाय पूर्व रेल्वेच्या बांदेल, आदिसप्तग्राम आणि मगरा स्थानकांवर तिसरी लाईन टाकण्याचे काम सुरू असल्यामुळे, येथून जाणाऱ्या काही गाड्यांवर परिणाम होणार आहे. या कामामुळे काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे, तर काही गाड्यांच्या वेळेतही बदल करण्यात आल्याचे रेल्वेने सांगितले आहे. (Changes in the route and timing of Indian Railways Learn new schedules)

आता दिल्ली जंक्शन-रेवाडी अनारक्षित एक्सप्रेस ट्रेन दररोज धावणार आहे

ट्रेन क्रमांक 04283/04990, दिल्ली जंक्शन-रेवाडी-दिल्ली जंक्शन अनारक्षित मेल/एक्स्प्रेस आता त्वरित प्रभावाने दररोज धावणार आहे. यापूर्वी ही ट्रेन रविवार वगळता आठवड्यातून सहा दिवस रेल्वे रुळावरून धावत होती. दिल्ली जंक्शन ते रेवाडी दरम्यान धावणाऱ्या या ट्रेनच्या वेळापत्रकात आणि थांबण्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे उत्तर रेल्वेने म्हटले आहे.

ट्रॅफिक ब्लॉकमुळे ट्रेनच्या वेळापत्रकात केला बदल

पूर्व रेल्वेच्या बांदेल, आदिसप्तग्राम आणि मगरा स्थानकांवर तिसऱ्या लाईनच्या तरतुदीसाठी 27 मे ते 30 मे दरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जाणार आहे. या कामामुळे येथून जाणाऱ्या काही गाड्यांवर देखील परिणाम होणार आहे.

या गाड्यांच्या मार्गात देखील बदल करण्यात येणार आहे

ट्रेन क्रमांक-13010, योगनगरी ऋषिकेश-हावडा दून एक्स्प्रेस, 26 मे ते 28 मे दरम्यान प्रवास सुरू करणारी, वर्धमान-दानकुनी मार्गे धावणार आहे. या गाड्या कामरकुंडू आणि बाली स्थानकावर थांबतणार आहेत. ट्रेन क्रमांक-13020, काठगोदाम-हावडा एक्सप्रेस, 26 मे ते 28 मे पर्यंत प्रवास करणारी, वर्धमान-दानकुनी मार्गे धावणार आहे. या गाड्या कामरकुंडू आणि बाली स्थानकावर थांबतील.

या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात येणार आहेत

ट्रेन क्रमांक-13019, हावडा-काठगोदाम एक्स्प्रेस, 27 मे ते 29 मे दरम्यान प्रवास सुरू करणारी, रात्री 09.45 ऐवजी 12.20 वाजता धावेल तर या गाड्या कामरकुंडू आणि बाली स्थानकावर थांबणार आहेत. ट्रेन क्रमांक-13009, हावडा-योगनगरी दून एक्स्प्रेस, जी 27 मे ते 29 मे दरम्यान प्रवास सुरू करेल, ती रात्री 08.25 ऐवजी 12.10 वाजता धावेल तर या गाड्या कामरकुंडू आणि बाली स्थानकावर थांबणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

Goa Today's Live News: इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील - पवन खेरा

Loksabha Election : प्रचारासाठी पायाला भिंगरी, जनसामान्‍यांना भेटीची आस; पल्‍लवी धेंपे यांचा प्रचार

Margao News : मतदानाला प्रेरित करण्‍यास पॅरा ग्‍लायडर्सचा वापर : आश्‍वीन चंद्रू

Heavy Rainfall in Brazil: ब्राझीलमध्ये पावसाचा कहर, दक्षिणेकडील राज्यात 10 जणांचा मृत्यू; राज्यपालांनी दिला आपत्तीचा इशारा

SCROLL FOR NEXT