CERT-In Team of The Government of India has recently issued a warning for the users of Google Chrome. Dainik Gomantak
अर्थविश्व

Google Chrome वापरता? सर्व कामे थांबवा अन् पहिल्यांदा 'हे' करा, सरकारकडून इशारा

CERT-IN ने या ब्राउझरमधील सुरक्षा दोषाबाबत माहिती दिली असून हॅकर्स त्याचा फायदा घेऊ शकतात.

Ashutosh Masgaunde

CERT-In Team of The Government of India has recently issued a warning for the users of Google Chrome:

जर तुम्ही मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये गुगल क्रोम ब्राउझर वापरत असाल तर तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा क्रोम ब्राउझर अपडेट करावा लागेल. असे न केल्यास तुम्हाला होणाऱ्या नुकसानीस तुम्ही स्वतः जबाबदार असाल, असा इशारा भारत सरकारने दिला आहे.

सरकारी भारतीय कॉम्प्युटर रिस्पॉन्स टीम म्हणजेच CERT-IN ने Google Chrome चा वापर धोकादायक असल्याचे म्हटले आहे. त्यामधे काही दोष आढळले असल्याने Google Chrome अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.

लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये घुसखोरी

जर तुम्हाला हॅकिंग किंवा फिशिंग सारख्या गोष्टी टाळायच्या असतील तर यासाठी ब्राउझर अपडेट करणे हा एकमेव मार्ग आहे.

गुगल क्रोममध्ये सापडलेल्या त्रुटी, तुमच्या मोबाइल आणि लॅपटॉपमधून संवेदनशील माहिती आणि पैशांच्या चोरीसाठी कारणीभूत ठरू शकतात.

सरकारी सल्लागार कंपनी CERT-IN ला गुगल क्रोममध्ये सुरक्षा त्रुटी आढळून आली आहे. या त्रुटीचा फायदा घेऊन, हॅकर्स तुमच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील अँटीव्हायरस बायपास करू शकतात आणि तुम्हाला गंडा घालू शकतात.

कोणत्या मोबाईल आणि लॅपटॉपला धोका

Linux आणि Mac साठी 115.0.5790.170 पूर्वीचे Google Chrome व्हर्जन आणि

Windows साठी Google Chrome 115.0.5790.170/.171 पूर्वीच्या वर्जन्सना

या व्हायरसचा सर्वाधिक धोका आहे.

ब्राउझर कसे अपडेट करावे

  • प्रथम Google Chrome उघडा. त्यानंतर वरच्या उजव्या कोपर्यात दिलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.

  • यानंतर खाली स्क्रोल करा आणि नंतर Chrome या पर्यायावर क्लिक करा.

  • यानंतर आपोआप अपडेट उपलब्ध होईल. अपडेट उपलब्ध असल्यास, डाउनलोड सुरू होईल.

  • अपडेट डाउनलोड झाल्यावर, Install पर्यायावर क्लिक करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT