Festival Advance Scheme Dainik Gomantak
अर्थविश्व

होळीच्या सणाला केंद्रीय कर्मचाऱ्यांची होणार 'दिवाळी'! सरकार देतंय 10,000 रु भेट

यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांची होळी मात्र मोठ्या थाटात साजरी करण्यात येणार आहे. केंद्र सरकार विशेष उत्सव योजना देण्याची घोषणा करू शकते.

दैनिक गोमन्तक

यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांची होळी मात्र मोठ्या थाटात साजरी करण्यात येणार आहे. केंद्र सरकार विशेष उत्सव योजना देण्याची घोषणा करू शकते. अ‍ॅडव्हान्स योजनेंतर्गत केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना 10,000 रुपयांची तरतूद करू शकते, म्हणजेच केंद्राचे कर्मचारी होळीच्या सणांना 10,000 रुपये अ‍ॅडव्हान्स घेऊ शकतात आणि त्यावरती कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही आणि त्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 असू शकते. गेल्या वर्षीही केंद्र सरकारने (Central Government) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही घोषणा केली होती. (7th Pay Commission Festival Advance Scheme)

सणांसाठी दिलेली ही आगाऊ रक्कम प्री लोडेड असणार आहे. हे पैसे आधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एटीएममध्ये नोंदवले जातील, त्यांना फक्त खर्च करावे लागणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिले जाणारे 10,000 रुपयांचे हे अ‍ॅडव्हान्स पूर्णपणे व्याजमुक्त असणार आहे आणि त्याच्या परतफेडीसाठी कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही. तसेच, या रकमेचा परतावा देखील 10 हप्त्यांमध्ये केला जाणार आहे. हे फक्त 1,000 रुपयांच्या मासिक हप्त्यांमध्ये भरता येणार आहे.

फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स स्कीम अंतर्गत सुमारे 4000-5000 कोटी रुपयांचे वाटप सरकारकडून जाहीर केले जाऊ शकते. राज्य सरकारनेही (State Government) ही योजना अंमलात आणली तर सुमारे 8,000-10,000 कोटी रुपये खर्च होतील, असे सांगण्यात आले आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, सरकार योजनेचे बँक शुल्क देखील घेणार आहे. कर्मचारी देखील ही आगाऊ रक्कम डिजिटल पद्धतीने खर्च करू शकणार आहेत.

यापूर्वीही, सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा रजा प्रवास भत्ता (LTA) दोन वर्षांसाठी वाढवला होता. यासोबतच केंद्रीय कर्मचारी मार्च 2022 पर्यंत ईशान्य, लडाख, अंदमान-निकोबार आणि जम्मू-काश्मीरच्या प्रवासासाठी रजा प्रवास भत्ता (LTA) वापरू शकतील.

केंद्रातील कर्मचाऱ्यांना दर 3 वर्षांनी रजा प्रवास भत्ता दिला जातो. यामध्ये कर्मचारी कुठेही गेल्यास प्रवास भत्ता मिळू शकतो. यामध्ये कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबतील सदस्य एकत्र फिरायला जाऊ शकतात. प्रवासात होणारे अनेक खर्च एलटीएच्या रकमेतून दिले जातात.

यापूर्वी, सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रवास भत्ता रजा योजनेत कॅश व्हाउचर योजना (LTC Cash Voucher Scheme) जाहीर केले होते. या योजनेंतर्गत, प्रवासी भत्त्याच्या बदल्यात कर्मचाऱ्यांना मिळणारी रोख रक्कम बाजारात सर्कुलेट केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT