Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

Pension New Rules: क्या बात है...! होळीपूर्वी कर्मचाऱ्यांसाठी गूडन्यूज, सरकार पेन्शन अन् पगार वाढवणार!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. तुम्हीही कर्मचारी असाल तर तुमचा पगारही वाढणार आहे.

Manish Jadhav

Pension And Salary Rules: होळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. तुम्हीही कर्मचारी असाल तर तुमचा पगारही वाढणार आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या (Employees) पगारात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारकडून नियोजन केले जात आहे. आजकाल देशभरात जुन्या पेन्शन योजनेबाबत अनेक चर्चा सुरु आहेत. अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये ओपीएस लागू करण्याची लढाई सुरु आहे.

पगार वाढणार पूर्ण 6000 रुपयांनी!

देशभरात जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकार कर्मचाऱ्यांची किमान वेतन मर्यादा वाढवण्याचा विचार करत आहे. होळीनंतर सरकार (Government) कर्मचाऱ्यांना वाढीव पगाराची भेट देऊ शकते. असे मानले जाते की, सरकार किमान पगार थेट 15,000 रुपयांवरुन 21,000 रुपये करेल.

शेवटची वाढ 2014 मध्ये झाली होती

कर्मचाऱ्यांची किमान वेतन मर्यादा वाढवल्यानंतर पेन्शनमध्येही बंपर वाढ होणार आहे. यापूर्वी 2014 मध्ये सरकारने ही मर्यादा वाढवली होती. सध्या नवीन वर्षात पुन्हा एकदा पगारवाढ करण्याचा सरकारचा विचार आहे. पगार वाढल्याने पीएफमधील योगदानही वाढेल आणि त्याचवेळी पेन्शनमध्येही वाढ होईल.

पीएफचे योगदानही वाढेल

भविष्य निर्वाह निधीच्या योगदानाबद्दल बोलायचे झाल्यास, किमान वेतन 15,000 रुपये मोजले जाते, ज्यामुळे EPS खात्यात जास्तीत जास्त 1250 रुपयेच योगदान दिले जाऊ शकते. सरकारने पगार मर्यादा वाढवली तर योगदानही वाढेल. पगार वाढल्यानंतर, मासिक योगदान रुपये 1749 (21,000 रुपयांच्या 8.33%) असेल.

जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शन यात काय फरक आहे

जुन्या पेन्शन योजनेबाबत बोलायचे झाल्यास, सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या कुटुंबीयांना पेन्शन मिळते.

उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याला आता 80,000 रुपये पगार मिळत असेल, तर निवृत्तीनंतर जुन्या पेन्शन योजनेनुसार त्याला सुमारे 35 ते 40 हजार रुपये पेन्शन मिळेल. याशिवाय, नवीन पेन्शनमध्ये या कर्मचाऱ्याला सुमारे 800 ते 1000 रुपये पेन्शन मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT