Ration Card Holders Dainik Gomantak
अर्थविश्व

Free Ration Scheme: मोफत राशन घेणाऱ्यांना लागली लॉटरी, सरकारने बदलले नियम

Free Ration Scheme Latest News: तुम्हीही प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा (PMGKAY) लाभ घेत असाल, तर आतापासून तुम्हाला दरमहा 35 किलो धान्य मोफत मिळेल.

दैनिक गोमन्तक

Free Ration Scheme: मोफत राशनची सुविधा घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा (PMGKAY) लाभ घेत असाल, तर आतापासून तुम्हाला दरमहा 35 किलो धान्य मोफत मिळेल. नवीन वर्षात सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, 1 जानेवारीपासून 80 कोटींहून अधिक लोकांना मोफत अन्नधान्याची सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे, तुम्हाला वर्षभर मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे. कोणत्या लोकांना दरमहा 35 किलो धान्य मोफत मिळणार आहे, ते जाणून घेऊया...

2023 मध्ये दर महिन्याला मोफत राशन मिळेल

खाद्य मंत्रालयाने सांगितले की, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत राशनची सुविधा दिली जात आहे. 2023 मध्ये लाभार्थ्यांना राशनची चिंता करण्याची गरज नाही, असे केंद्र सरकारने (Central Government) म्हटले आहे. सरकारने 2023 वर्षभर मोफत राशन सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत अन्नधान्य मिळेल.

ज्यांना दरमहा 35 किलो राशन मिळेल

सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, NFSA अंतर्गत प्राधान्य कुटुंबांना प्रति व्यक्ती आणि दरमहा मोफत राशनची सुविधा मिळेल. प्रत्येक लाभार्थ्याला 5 किलो मोफत राशन मिळेल, असे सरकारने म्हटले आहे. त्याचबरोबर अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरमहा 35 किलो राशन मिळणार आहे.

पूर्वी अनुदान मिळत होते

यासोबतच, डिसेंबर 2022 पर्यंत, NFSA च्या लाभार्थ्यांना गहू आणि तांदूळ यांसारख्या भरडधान्यांसाठी प्रति किलो फक्त 1 रुपये आणि 2 रुपये खर्च करावे लागतील. या लोकांना राशनवर सबसिडीचा (Subsidy) लाभ मिळत होता, मात्र यंदा या लोकांना मोफत राशन मिळणार आहे.

सरकारवर 2 लाख कोटींहून अधिक खर्च होणार

गरिबांच्या सुविधा लक्षात घेऊन शासनाने विशेष सुविधा सुरु केली आहे. अन्न अनुदानाच्या रुपात, सरकार या वर्षात म्हणजे 2023 मध्ये 2 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च करेल, जेणेकरुन देशातील गरीब आणि इतर घटकांना अन्नाची चिंता करावी लागणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

Mangal Gochar 2026: 16 जानेवारीला मंगळ ग्रहाचे पहिले गोचर! 'या' 3 राशींच्या लोकांवर होणार धनवर्षा; आरोग्य, प्रेम आणि व्यवसायातही मिळणार यश

SCROLL FOR NEXT