PM Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

Pension Rules: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, पेन्शन नियमात बदल; केंद्र सरकारने दिली माहिती!

Pension Rules News: सरकारने पेन्शन नियमांमध्ये मोठा बदल केला असून, त्याचा परिणाम सर्व प्रकारच्या केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Pension Rules Changed: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने पेन्शन नियमांमध्ये मोठा बदल केला असून, त्याचा परिणाम सर्व प्रकारच्या केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर होणार आहे. सरकारने जारी केलेले नवीन नियम 1 जानेवारी 2023 पासून लागू होतील. कोणत्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ते जाणून घ्या...

पीएफआरडीएने यापूर्वी नियम शिथिल केले होते

1 जानेवारी 2023 पासून सरकारी कर्मचार्‍यांना (Employees) त्यांच्या संबंधित नोडल कार्यालयांमार्फतच निधीतून आंशिक पैसे काढण्याची विनंती करावी लागेल. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने कोरोना महामारी दरम्यान नियम शिथिल केले होते, ज्या अंतर्गत NPS अंतर्गत स्वयंचलित घोषणा करण्याची परवानगी होती.

परिस्थिती सामान्य झाल्यावर नियमांमध्ये बदल

अधिकृत माहितीनुसार, कोरोना महामारीच्या (Corona Epidemic) वेळी लोकांच्या सुविधा लक्षात घेऊन नियम शिथिल करण्यात आले होते, परंतु आता परिस्थिती सामान्य होत असल्याने सरकारी क्षेत्रातील संबंधितांनी त्यांच्या विनंती अर्ज पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन पेन्शनला विरोध

सध्या देशात नव्या पेन्शन प्रणालीबाबत जोरदार विरोध सुरु आहे. राज्यांचे कर्मचारी जुनी पेन्शन बहाल करण्याची मागणी करत आहेत. विशेष म्हणजे, अनेक राज्यांतील केंद्रीय कर्मचाऱ्यांचे स्वतःचे भवितव्य या योजनेत सुरक्षित नसल्याचे मत आहे. सन 2004 मध्ये केंद्र सरकारने जुनी पेन्शन योजना रद्द करुन त्याऐवजी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली सुरु केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT