Ration Card Holder Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Card Rules: राशनकार्डच्या नियमात मोठा बदल, करोडो लाभार्थ्यांना मिळणार नाही धान्य!

Ration Card Rules: राशनकार्डधारकांसाठी एक मोठी बातमी आहे. तुम्हीही मोफत राशनचा लाभ घेत असाल तर सरकारने नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.

दैनिक गोमन्तक

Ration Card Rules: राशनकार्डधारकांसाठी एक मोठी बातमी आहे. तुम्हीही मोफत राशनचा लाभ घेत असाल तर सरकारने नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. केंद्र सरकारसह राज्य सरकारने कार्डधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आतापासून अनेकांना पूर्वीपेक्षा कमी राशन मिळणार आहे. यासोबतच राज्य सरकारकडून एक क्रमांकही जारी करण्यात आला आहे. कोणते नियम बदलले आहेत ते जाणून घ्या...

आतापासून कमी तांदूळ मिळेल

राशन कार्डचे (Ration Card) नियम बदलताना सरकारने तांदळाचा कोटा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापासून राज्यातील लाखो लाभार्थ्यांना पूर्वीपेक्षा 1 किलो कमी तांदूळ मिळणार आहे. तेलंगणा सरकारने राज्यातील जनतेसाठी हा निर्णय घेतला आहे. आतापासून तांदूळ वितरणाचे प्रमाण कमी करण्यात आल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.

अनेक लाभार्थ्यांची नावे कापण्यात आली

याशिवाय, हरियाणा (Haryana) सरकारने राशनकार्डधारकांसाठी एक नवीन टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. राज्यातील अनेक लोकांची नावे राशनकार्डमधून कमी आली असून, त्यानंतर लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत ज्या लाभार्थ्यांची नावे चुकीच्या पद्धतीने कापली गेली आहेत, त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी दोन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.

राज्य सरकारने हे क्रमांक जारी केले आहेत

हरियाणा सरकारने 1967 आणि 1800 180 287 क्रमांक जारी केले आहेत. या क्रमांकांवर तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. या क्रमांकांवर तक्रारी नोंदवून तात्काळ कारवाई केली जाईल, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे.

केंद्र सरकार 2 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे

या सर्वांशिवाय यंदा गरिबांच्या सुविधा लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून विशेष सुविधा सुरु करण्यात आली आहे. खाद्य अनुदानाच्या रुपात, सरकार या वर्षात म्हणजे 2023 मध्ये 2 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च करेल, जेणेकरुन देशातील गरीब आणि इतर घटकांना अन्नाची चिंता करावी लागणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT