Money |Low Interest Rate Dainik Gomantak
अर्थविश्व

Interest Rate: धमाका! या सरकारी बँकेने दिली सर्वात मोठी भेट, लोकांना मिळणार जादा पैसे

Diwali 2022: यंदा दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच सर्वत्र ऑफर सुरु झाल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Fixed Deposit: यंदा दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच सर्वत्र ऑफर सुरु झाल्या आहेत. दरम्यान, लोकांना अनेक सवलती देखील मिळत आहेत. मात्र, आता एका सरकारी बँकेने मोठे पाऊल उचलले आहे. वास्तविक, या बँकेने एफडीवरील व्याज वाढवले ​​आहे. त्यामुळे त्याचा थेट फायदा बँकेशी संबंधित अशा लोकांना होईल, ज्यांनी त्यांची एफडी केली आहे.

इतकी वाढ

बँकेने 7 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या FD वरील व्याजदर 3.25% पर्यंत वाढवला आहे. 46 दिवस ते 90 दिवसात मॅच्युअर होणाऱ्या FD वर 25 bps ने 4% वरुन 4.25% ने वाढ केली आहे. याशिवाय 91 दिवसांपासून ते 179 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या FD वर आता 4.50% दराने व्याज मिळेल, पूर्वी ते 4.05% होते. यात 45 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय, 180 दिवस ते 269 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 5.90% व्याज मिळेल. पूर्वी तो 4.65% होता. यामध्ये 125 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे.

मध्ये देखील वाढ झाली

याशिवाय, कॅनरा बँकेने 270 दिवसांपासून एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या FD वर 4.65% वरुन 135 बेस पॉइंट्स (bps) व्याजदर वाढवला आहे. बँकेने 1 वर्ष ते 2 वर्षांच्या मुदतीच्या FD वरील व्याजदर 5.50% वरुन 6.50% पर्यंत वाढवला आहे. त्यात 100 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. याशिवाय, 1 वर्ष किंवा त्याहून अधिक मुदतीच्या परंतु 2 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या FD वरील व्याजदर 5.55% वरुन 6.50% करण्यात आला आहे. ते 95 bps ने वाढले आहे.

दीर्घकालीन FD

याशिवाय, 666 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवरील व्याजदर 6% वरुन 7.00% झाला आहे. 2 वर्ष किंवा त्याहून अधिक मुदतीच्या परंतु 3 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या FD वरील व्याजदर 5.60% वरुन 6.50% पर्यंत वाढला असताना त्यात 100 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे.

FD वर व्याज

कॅनरा बँकेने 3 वर्षात आणि त्याहून अधिक मुदतीच्या FD वरील व्याजदर 5.75% वरुन 6.50% पर्यंत वाढवला आहे. त्यात 75 bps ने वाढ करण्यात आली आहे. 5 वर्षात आणि त्याहून अधिक मुदतीच्या FD वरील व्याजदर 5.75% वरुन 7.00 पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यात 125 bps ने वाढ झाली आहे.दीर्घकालीन FD

याशिवाय, 666 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवरील व्याजदर 6% वरुन 7.00% झाला आहे. 2 वर्ष किंवा त्याहून अधिक मुदतीच्या परंतु 3 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या FD वरील व्याजदर 5.60% वरुन 6.50% पर्यंत वाढला असताना त्यात 100 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT