Soft Drinks Dainik Gomantak
अर्थविश्व

Soft Drinks शौकीनांसाठी आनंदाची बातमी, सरकार बनवत आहे मोठी योजना; जाणून घ्या

GST on Soft Drinks: जर तुम्हीही शीतपेय पिण्याचे शौकीन असाल तर तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते.

Manish Jadhav

GST on Soft Drinks: जर तुम्हीही शीतपेय पिण्याचे शौकीन असाल तर तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. छोट्या व्यावसायिकांसोबतच सर्वसामान्यांनाही मोठा दिलासा मिळू शकतो. शीतपेयांवरील जीएसटी कमी करण्याचा सरकारचा विचार आहे.

शीतपेयेवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दर 28 टक्क्यांवरुन कमी करण्याची मागणी करत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) सोमवारी सांगितले की, उपकर लावल्यानंतर प्रभावी दर 40 टक्क्यांपेक्षा कमी होईल.

अर्थ मंत्रालयाला विनंती केली

निवेदनानुसार, CAIT ने केंद्रीय वित्त मंत्रालयाला शीतपेयांवर GST दर कमी करण्याचा विचार करण्याची विनंती केली. त्याऐवजी त्यांनी, साखर-आधारित कर (SBT) पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे, ज्यामध्ये उत्पादनांमधील साखरेचे प्रमाण लक्षात घेऊन टॅक्स दर निश्चित केले जातात.

17 सप्टेंबर रोजी बैठक झाली

सीएआयटीचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, शीतपेय उत्पादनांवरील जीएसटी कमी करण्याच्या मुद्द्यावर एक मोहीम सुरु केली जाईल, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांना या दिशेने पावले उचलण्यास प्रवृत्त केले जाईल.

17 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या GST परिषदेच्या बैठकीत कार्बोनेटेड शीतपेय उत्पादनांवर 28 टक्के आणि 12 टक्के उपकर दराने GST लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

उद्योगांची अवस्था बिकट झाली

कोरोनामुळे (Corona) या उद्योगाची अवस्था बिकट झाली आहे. याशिवाय गेल्या काही महिन्यांत जीएसटी अधिकाऱ्यांनी करचुकवेगिरीच्या नावाखाली अनेक स्थानिक वेबेज कंपन्यांवर कारवाई केली आहे. यामुळे स्थानिक कंपन्या संतप्त आहेत.

या कारवाईबाबत कर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या कंपन्या फ्रूट बेव्हरेजच्या नावाखाली गोड पदार्थ बनवून नफा कमवत आहेत. गोड पेयांवर कराचा दर 40 टक्के आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

Rohit Sharma TV Show: क्रिकेटनंतर मनोरंजन विश्वात 'हिटमॅन'ची नवी इनिंग; रोहित शर्माचा स्वतःचा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Shukra Gochar 2026: कौटुंबिक सुख, रोमान्स अन् अफाट पैसा...! शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन; 5 राशींना होणार तगडा धनलाभ

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

रस्ता सुरक्षेपेक्षा दंडवसुलीला सरकारचे प्राधान्य; 22 ब्लॅकस्पॉटची दुरुस्त कधी? 1,520 मृत्यूंबाबत काँग्रेस सेवा दलाचे सवाल

SCROLL FOR NEXT