PM Narendra Modi
PM Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

Railways: रेल्वे कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, मोदी सरकारने बोनस देण्याची केली घोषणा

दैनिक गोमन्तक

Cabinet Meeting/ Railways Employee Bonus: सणासुदीच्या काळात केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मोदी मंत्रिमंडळाने आज रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, कॅबिनेट बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस दिला जाईल. यासोबतच मंत्रिमंडळाने तेल कंपन्यांना 22000 कोटी रुपयांचे एकरकमी अनुदान दिले आहे, जेणेकरुन आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमतीत वाढ होऊनही देशांतर्गत एलपीजीच्या किमतीत वाढ न झाल्याने होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शासनाने अधिसूचना जारी केली

28 सप्टेंबर 2022 रोजी सरकारने (Government) डीए वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अधिसूचना जारी करुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. 1 जुलै 2022 पासून महागाई भत्त्याचे सुधारित दर लागू केले जातील, असे या माहितीत म्हटले आहे. लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे येतील. सरकारच्या महागाई (Inflation) भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयामुळे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 62 लाख पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी मार्चमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 टक्के महागाई भत्त्यात वाढ केली होती. त्यावेळी डीए 31 टक्क्यांवरुन 34 टक्के झाला होता.

3 टक्क्यांनी वाढू शकते

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पीएफ आणि ग्रॅच्युइटीची गणना मूळ वेतन आणि डीएच्या (DA) आधारे केली जाते. त्यामुळे या परिस्थितीत डीए वाढल्याने पीएफ आणि ग्रॅच्युइटीही वाढणार आहे. ही वाढ 3 टक्क्यांपर्यंत असू शकते, असे मानले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: भारतीय नौदलाच्या विमानाचे दाबोळीवर आपत्कालीन लँडिंग, चार फ्लाईट्स वळवल्या

Ponda News : ८४ रोजंदारी कामगारांचा पगार देणार; फोंडा पालिका बैठकीत निर्णय

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये जमावाकडून 4 पाकिस्तानी विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या, दूतावासाकडे जीवाची भीक मागितली पण...

Pernem News : पेडणे तालुक्यातील रस्त्यांची ‘वाट’; रस्ते पावसाळ्यापूर्वी तरी दुरुस्त होतील का

Goa Today's Live News: मुष्टिफंड शाळेला कारणे दाखवा नोटीस

SCROLL FOR NEXT