Businessman KP Singh Dainik Gomantak
अर्थविश्व

Love At 91: प्रेमात पडलोया! वयाच्या 91 व्या वर्षी ज्येष्ठ उद्योगपती प्रेमात, नवीन जोडीदाराची...

Businessman KP Singh: वास्तविक, हा उद्योगपती दुसरा कोणी नसून डीएलएफ ग्रुपचे एमेरिटस चेअरमन केपी सिंग आहेत.

Manish Jadhav

KP Singh DLF Chairman: जगजीत सिंग यांची एक गझल आहे, ''ना उम्र की सीमा हो..ना जन्म का हो बंधन, जब प्यार करे कोई.'' ही ओळ खरोखरच रसिकांसाठी प्रार्थनेसारखी आहे. असाच एक किस्सा सध्या चर्चेत आहे, जेव्हा एका 91 वर्षीय भारतीय व्यावसायिकाने आपले प्रेम जाहीरपणे व्यक्त केले.

दरम्यान, वयाच्या 91 व्या वर्षी प्रेमात पडल्याचे त्याने सांगितले आहे. एवढेच नाही तर त्याने आपल्या नवीन जोडीदाराबद्दलही सांगितले आहे. विशेष म्हणजे, त्याने आपल्या जोडीदाराचे नावही सांगितले. त्याचबरोबर, आपण प्रेमात कसे पडलो हे देखील त्याने सांगितले आहे. त्याची ही कहाणी सोशल मीडियावरही (Social Media) व्हायरल झाली आहे.

'आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली होती'

वास्तविक, हा उद्योगपती दुसरा कोणी नसून डीएलएफ ग्रुपचे एमेरिटस चेअरमन केपी सिंग आहेत. अलीकडेच एका खासगी टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, पत्नीच्या मृत्यूनंतर माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली होती.

वर्षानुवर्षे कोणाशी तरी सोबत राहिल्यानंतर, जेव्हा आपण त्यांना गमावतो तेव्हा असे दुःख शब्दात व्यक्त करता येत नाही. तुमचे संपूर्ण आयुष्य बदलते. पण आता माझ्या आयुष्यात नवीन जोडीदार आला आहे. तिचे नाव जाहीर करताना ते म्हणाले की, मी तिच्या प्रेमात पडलो आहे.

त्यांनी हे नाव सांगितले

केपी सिंह यांनी सांगितले की, मला नवीन जोडीदार सापडला आहे. तिचे नाव शीना आहे. ती माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्तींपैकी एक आहे. ती उत्साही आहे आणि मला प्रेरणा देते. शीना मला प्रत्येक पावलावर साथ देते. तिने मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली आणि आता ती माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे.

दुसरीकडे, केपी सिंह यांच्या पहिल्या पत्नीचे वयाच्या 65 व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाल्याची माहिती आहे. केपी सिंग हे रिअल इस्टेटमधील (Real Estate) अव्वल श्रीमंत अब्जाधीशांपैकी एक आहेत.

DLF चे एमेरिटस चेअरमन

एका अहवालानुसार केपी सिंग ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये केपी सिंग 299व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती $7.63 अब्ज (सुमारे 63200 कोटी रुपये) आहे.

त्यांचे सासरे राघवेंद्र सिंग यांनी सुरु केलेल्या दिल्ली लँड अँड फायनान्स (DLF) या कंपनीत सामील होण्यासाठी त्यांनी 1961 मध्ये सैन्यातील नोकरी सोडली होती.

पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी कंपनीचे (Company) अध्यक्षपद भूषवले. आता ते डीएलएफचे एमेरिटस चेअरमन आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

SCROLL FOR NEXT