Bug in iPhone 15! Apple blames Instagram and Uber for overheating problem. Dainik Gomantak
अर्थविश्व

iPhone 15 मध्ये बग! ओव्हरहिटिंगच्या समस्येसाठी अ‍ॅपलचे Instagram अन् Uber कडे बोट

ओव्हरहाटिंगच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, Apple ने सॉफ्टवेअर बग आणि Instagram आणि Uber सारख्या लोकप्रिय अ‍ॅप्सशी संबंधित इतर समस्यांमुळे iPhone 15 मॉडेल्स गरम होत असल्याचा आरोप केला आहे.

Ashutosh Masgaunde

Bug in iPhone 15! Apple blames Instagram and Uber for overheating problem:

Apple च्या नवीन iPhone 15 बद्दल लोकांमध्ये खूप क्रेझ आहे. पण ज्या ग्राहकांनी iPhone 15 खरेदी केला आहे ते अ‍ॅपलच्या या नवीन फोनबद्दल तक्रारी करत आहेत. iPhone 15 सध्या ओव्हरहिटिंगच्या समस्येला तोंड देत आहे

Apple iPhone 15 वापरणाऱ्या युजर्सनी तक्रार केली आहे की त्यांचा iPhone जास्त गरम होत आहे.

ओव्हरहाटिंगच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, Apple ने सॉफ्टवेअर बग आणि Instagram आणि Uber सारख्या लोकप्रिय अ‍ॅप्सशी संबंधित इतर समस्यांमुळे iPhone 15 मॉडेल्स गरम होत असल्याचा आरोप केला आहे.

कॅलिफोर्नियामध्ये मुख्य कार्यालय असलेल्या अ‍ॅपल, कंपनीने नुकतेच सांगितले की, ते iOS17 सिस्टमसाठी एका अपडेटवर काम करत आहे जे डिव्हाइस ओव्हरहाटिंग समस्या दूर करण्यात मदत करेल. तसेच कंपनी त्या अ‍ॅप्सवर काम करत आहे जे सिस्टम ओव्हरलोड करतात.

मेटा प्लॅटफॉर्मच्या मालकीच्या इंस्टाग्रामने या आठवड्याच्या सुरुवातीला आयफोन ऑपरेटिंग सिस्टमवर डिव्हाइसला जास्त गरम होण्यापासून रोखण्यासाठी त्यांचे सोशल मीडिया अ‍ॅप अपडेट केले आहे.

Apple ने सांगितले की Uber आणि व्हिडिओ गेम Asphalt 9 सारखे इतर अ‍ॅप्स अजूनही त्यांचे अपडेट रोल आउट करण्याच्या प्रक्रियेत आहेत.

कंपनीने स्वतःचे सॉफ्टवेअर केव्हा रिलीझ केले जाईल याची टाइमलाइन सेट केली नाही, परंतु ते म्हणाले की, कोणत्याही समस्यांमुळे आयफोन 15 मालकांना अपडेटची प्रतीक्षा करत असताना त्यांचे डिव्हाइस वापरण्यापासून रोखू नये.

Apple ने माहिती दिली की, कंपनीने काही दोष ओळखली आहेत ज्यामुळे iPhone 15 जास्त गरम होत आहे.

अ‍ॅपल कंपनीच्या आयफोन्सना याआधीही ओव्हरहिटींगच्या समस्येचा सामना करावा लागला आहे. याआधीही अ‍ॅपलच्या उपकरणांमध्ये ओव्हरहिटींगच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे असे म्हटले जात आहे की, नवीन iPhone 15 गरम होणे ही नवीन गोष्ट नाही.

व्हिडिओ गेम्स आणि इतर तत्सम अ‍ॅप्लिकेशन्स वापरताना iPhone गरम होऊ शकतो. पण Apple iPhone 15 मध्ये जास्त गरम होण्याच्या तक्रारी आहेत.

अ‍ॅपलने सांगितले की ओव्हरहिटींगची समस्या त्याच्या गुळगुळीत टायटॅनियम उपकरणाशी संबंधित नाही. याशिवाय, सी-टाइप चार्जिंग पोर्टमुळे ओव्हरहाटिंगची ही समस्या येत असल्याचे वृत्त देखील कंपनीने फेटाळून लावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT