Google has started manufacturing Chromebooks in India in collaboration with HP:
Google ने HP च्या सहकार्याने भारतात Chromebook चे उत्पादन सुरू केले आहे. वैयक्तिक संगणक (PC) निर्मीती करणारी कंपनी एचपी ने नुकतीच ही माहिती दिली.
चेन्नईजवळील फ्लेक्स प्लांटमध्ये Chromebook उपकरणे तयार केली जात आहेत. तिथे HP ऑगस्ट 2020 पासून लॅपटॉप आणि डेस्कटॉप तयार करत आहे.
Google चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई यांनी सोमवारी 'X' वर एका पोस्टमध्ये सांगितले की, "आम्ही भारतात Chromebooks तयार करण्यासाठी HP सोबत भागीदारी करत आहोत.
भारतात प्रथमच क्रोमबुकचे उत्पादन केले जात आहे. यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या आणि सुरक्षित संगणकीय क्षेत्रात प्रवेश मिळेल.”
HP च्या प्रवक्त्याने याला दुजोरा देत म्हटले की, भारतात Chromebook चे उत्पादन सुरू झाले आहे. नवीन Chromebooks ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्यांची किंमत 15,990 रुपयांपासून सुरू होते. HP देखील सरकारच्या 17,000 कोटी रुपयांच्या उत्पादन-लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेत अर्जदार आहे.
गुगल आणि एचपीने जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, 12वीपर्यंतच्या शिक्षणासाठी Chromebook हे प्रमुख साधन आहे.
जगभरातील पाच कोटींहून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांना याचा लाभ होत आहे. Chromebooks चे स्थानिक उत्पादन भारतात HP च्या PC पोर्टफोलिओचा विस्तार करते.
Chromebook हा एक लॅपटॉप आहे. जो क्रोम ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या लॅपटॉपची ऑपरेटिंग सिस्टीम (OS) गुगल कंपनीने बनवली आहे, म्हणून याला गुगल क्रोमबुक म्हणतात.
क्रोमबुक हे गुगलच्या सर्व ऍप्लिकेशन्स आणि सॉफ्टवेअरला सपोर्ट करते, म्हणजेच गुगलने तयार केलेले सर्व अॅप्स आणि सॉफ्टवेअर क्रोमबुकमध्ये चालवता येतात.
Chromebooks विशेषत: ऑनलाइन वापरासाठी डिझाइन केले आहेत, बहुतेक अनुप्रयोग इंटरनेटवर ऑनलाइन चालतात. या लॅपटॉपमध्ये खूप कमी हार्डवेअर स्पेसिफिकेशन्स आहेत, ज्यामुळे क्रोमबुक लॅपटॉपची किंमत इतर विंडोज लॅपटॉपपेक्षा खूपच कमी आहे.
क्रोमबुक नोटबुक लॅपटॉपपेक्षा कमी किंमतीत येतात. जे Google च्या ChromeOS वर चालतात. HP 2020 पासून सातत्याने भारतात याच्या उत्पादनाचा विस्तार करत आहे. HP डिसेंबर 2021 पासून भारतात EliteBooks, HP ProBooks आणि HP G8 मालिका नोटबुक्ससह लॅपटॉपची मालिका तयार करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.