PM Kisan Yojana Budget 2023 | PM Kisan Scheme Budget Highlights  Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Yojana Budget 2023: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीएम किसान योजनेची वाढणार रक्कम!

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा सरकार करु शकते.

दैनिक गोमन्तक

PM Kisan Yojana 2023: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा सरकार करु शकते. वास्तविक, केंद्र सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पाचवा अर्थसंकल्प सादर करणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबाबत मोठी घोषणा अपेक्षित आहे. कोरोना संसर्गामुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी खास ठरु शकतो.

पंतप्रधान किसान योजनेची रक्कम वाढणार!

वास्तविक, महागाईचे नवे विक्रम असताना या अर्थसंकल्पाकडून जनतेला मोठ्या आशा आहेत. केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी (Farmers) पीएम किसान सन्मान निधीशी संबंधित मोठी घोषणा करु शकते, असे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर तुम्हाला एक चांगली बातमी मिळू शकते. म्हणजे तुमचे उत्पन्न दुप्पट होऊ शकते.

सरकार करु शकते ही मोठी घोषणा!

आगामी अर्थसंकल्प 2023 मध्ये, केंद्र सरकार (Central Government) पीएम किसान सन्मान निधीमध्ये वार्षिक 6,000 रुपयांच्या वाढीची घोषणा करु शकते. प्रत्यक्षात या योजनेंतर्गत अनेक वेळा रक्कम वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी 2022 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातही किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र यंदा या अर्थसंकल्पात या योजनेच्या रकमेत वाढ होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. याशिवाय येत्या आर्थिक वर्षापासून ही रक्कम 6 हजारांवरुन 8 हजार रुपयांपर्यंत वाढवून शेतकऱ्यांना वर्षभरात 2 हजार रुपयांचे 4 हप्ते देता येतील, अशीही चर्चा आहे.

वर्षाला 3 हप्ते मिळतात

विशेष म्हणजे, पंतप्रधान किसान योजना ही सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. या अंतर्गत, देशभरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी, सरकार त्यांच्या खात्यावर 2-2 हजार रुपयांचे तीन हप्ते म्हणजे वार्षिक 6 हजार रुपये पाठवते. आतापर्यंत या योजनेचे 12 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात आले आहेत. आता शेतकरी 13व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. शासनाने या योजनेची रक्कम वाढविल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मतचोरी करून पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न" प्रियांका गांधी-वद्रा यांची 'NDA'वर टीका; 65 लाख नावे वगळल्याचा आरोप

Department of Animal Husbandry: पशुसंवर्धन खाते प्रमुखांविना ठप्प, कामधेनू सुधारित योजनेसह अनेक योजना प्रभावित

Goa Today's News Live: बांबोळीत पुन्हा अपघात, दुभाजकाला धडकली बस

Horoscope: आजचा दिवस 'गोल्डन'! गुरुवारी 'या' 3 राशींच्या नशिबाचे दरवाजे उघडणार, परिश्रमाचे उत्तम फळ मिळणार

Night Vigil App: तंत्रज्ञानामुळे रात्रीची सुरक्षा होणार अधिक सक्षम, विद्यार्थ्यांनी बनवलेले 'नाईट व्हिजिल' ॲप पोलिसांसाठी नवे हत्‍यार

SCROLL FOR NEXT