बऱ्याचवेळेस आपण फ्लाइट आणि जहाजांमधून प्रवास करताना आपला मोबाइलला फोन वापरू शकत नाहीत. पण आता हे शक्य होणार आहे. कारण BSNL ने तशी नवी योजना आणली आहे. आणि त्यामुळे आपण सारे लवकरच मो फ्लाइट आणि जहाजांमध्ये इंटरनेटचा (Internet) वापर करू शकणार आहोत. एक प्रमुख जागतिक मोबाईल उपग्रह संप्रेषण प्रमुख कंपनी Inmarsat ने माहिती दिली आहे की ' त्यांच्या कंपनीचा भागीदार BSNL ने भारतात ग्लोबल एक्सप्रेस (GX) मोबाईल ब्रॉडबँड सेवा पुरवण्यासाठी आवश्यक परवाने मिळवले आहेत. यासह, भारतीय देशांतर्गत विमान कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या देशभरात उड्डाण दरम्यान उच्च-स्पीड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यास सक्षम असतील.'
Inmarsat कंपनीने याबाबत एक निवेदन जरी करत स्पष्ट केले आहे की, दूरसंचार विभागाकडून भारत संचार निगम लि. (BSNL) उड्डाण आणि सागरी कनेक्टिव्हिटीसाठी (IFMC) ग्लोबल एक्सप्रेस विमानप्रवासात आणि सागरी क्षेत्रात भारतीय ग्राहकांना उपलब्ध होईल.
BSNL ची ही घोषणा महत्त्वाची माली जात आहे. कारण याचा अर्थ असा आहे की भारतीय विमानसेवा देश आणि परदेशात उड्डाण दरम्यान कनेक्टिव्हिटीसाठी GX वापरण्यास सक्षम असतील. तसेच, हिंद महासागर प्रदेशात कार्यरत असलेल्या देशातील व्यावसायिक कंपन्या त्यांच्या जहाजांमध्ये डिजीटायझेशन वाढवण्यास सक्षम होतील जेणेकरून जहाजे अधिक चांगल्या प्रकारे हाताळता येतील.
निवेदनानुसार, सार्वजनिक क्षेत्रातील बीएसएनएलला दिलेला परवाना सरकार आणि इतर वापरकर्त्यांना जीएक्स सेवा देऊ करण्यास अनुमती देईल. ग्राहक आणि इतर भागीदारांसाठी टप्प्याटप्प्याने सेवा ही सुरू केली जाईल.
GX म्हणजे नेमके काय आहे
GX बॅन्डवर काम करते जे एक हाय स्पीड ब्रॉडबँड नेटवर्क आहे. जगात कुठेही प्रवासा दरम्यान अधिक चांगली कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या उद्देशाने GX ही टेक्नॉलॉजि डिझाइन केली गेली आहे. ही सेवा उच्च बँडविड्थ, विश्वसनीयता आणि सुरक्षा प्रदान करते त्याचबरोबर GX व्यावसायिक आणि सरकारी स्तरावरील ग्राहकांच्या गरजा देखील मोठ्या प्रमाणात पूर्ण करते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.