Good day Biscuits Dainik Gomantak
अर्थविश्व

Good Day Biscuits Price: 'गुड डे' खाणाऱ्यांच्या खिशाला बसू शकते कात्री

Britannia: ब्रिटानिया कंपनीकडून उत्पादनांच्या किंमतीत 10 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा विचार सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

युक्रेन-रशियात सुरू असलेल्या युद्धामुळे आणि इंडोनेशियाच्या पामतेल निर्यातीच्या बंदीनंतर भारतात महागाईचा स्फोट झाला आहे. खाद्यपदार्थांचे भाव गगनाला भिडले आहेत. याच पार्श्वभूमीवर कच्च्या मालाच्या किमतीमुळे आता 'गुड डे बिस्किट' या प्रसिद्ध बिस्किट ब्रँडची निर्माती ब्रिटानियाने आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याचा विचार सुरू केला आहे. यामुळे ब्रिटानियाची उत्पादने 10 टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतात.

गेल्या आर्थिक वर्षात ब्रिटानियाने आपल्या उत्पादनांच्या किमती 10 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. महागाई सातत्याने वाढत असल्यामुळे कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने कंपनीकडे उत्पादनांच्या किमती वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही असे ब्रिटानिया कंपनीने सांगितले आहे.

* कच्च्या मालाच्या किमतीमद्धे वाढ
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार अलीकडच्या काही दिवसांत गहू, खाद्यतेल आणि साखरेच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे पॅकेज फूड कंपनीला त्यांच्या उत्पादनांच्या किमती आणखी वाढवाव्या लागतील असं ब्रिटानियाचे व्यवस्थापकीय संचालक वरुण बेरी यांचे म्हणणं आहे. रुसो-युक्रेन युद्धामुळे गव्हाच्या किमती वाढल्या आहेत आणि आता इंडोनेशियन पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी आल्याने खाद्यतेलही महाग झाले आहे.

ब्रिटानिया कंपनी उत्पादनांच्या किंमती 10 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात
जर महागाई नियंत्रणात न आल्यास कंपनी आपली उत्पादने 10 टक्क्यांनी महाग करू शकते. सध्या आपण अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहोत. आम्ही दर महिन्याला परिस्थितीचा आढावा घेत आहोत. ग्राहकांवर जास्त बोजा पडू नये यासाठी आम्ही प्रयत्न करू. पण प्रमुख वस्तूंच्या किमती वाढत राहिल्या तर आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागतील असं कंपनी प्रशासनाचं म्हणणं आहे.

भारत-युक्रेन आयात-निर्यातीच्या संकटामुळे पुरवठा खंडित झाल्यामुळे जगभरात गव्हाच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा भारतावरही परिणाम झाला आहे. भारतीय गव्हाच्या निर्यातीच्या मागणीत अचानक वाढ झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात गव्हाचे दरही वाढले आहेत. तसेच इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवर बंदी घातल्याने आधीच महागड्या खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT