Britain's Diageo cut off to Russia liquor supplies Dainik Gomantak
अर्थविश्व

रशियात 70000 दुकानांत मिळते ब्रॅंडेड दारू; आता ब्रिटिश कंपनीने केला पुरवठा बंद

रशियाच्या कॉकटेल कल्चरमध्ये या कंपनीचे मद्य लोकप्रिय आहे.

दैनिक गोमन्तक

रशियाने युक्रेनवर आक्रमण (Russia Attack On Ukraine) केल्यानंतर जगातील अनेक कंपन्या तेथून आपल्या व्यवसायाची उचलबांगडी करत आहे. आपला व्यवसाय घेऊन देश सोडत आहेत. त्यात जगातील सर्वात मोठ्या दारू कंपन्यांपैकी एक असलेल्या ब्रिटनच्या डियाजिओचाही (Diageo) समावेश आहे. कंपनीने रशियातील दारूचा पुरवठा बंद केला आहे.

70,000 स्टोअर्स, 19,000 बार

Diageo रशियामध्ये जॉनी वॉकर, सिंगलटोन, तालिस्कर, मोर्टलॅश स्कॉच, कॅप्टन मॉर्गन यांसारख्या ब्रँडेड मद्यांची विक्री करते. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, त्याने 2006 पासून रशियामध्ये स्वतःचा व्यवसाय मोठा केला आहे. सध्या, कंपनी रशियाच्या 11 टाइम झोनमध्ये 70,000 हून अधिक दुकाने आणि 19,000 बारमध्ये दारूचा पुरवठा करते. रशियाच्या कॉकटेल कल्चरमध्ये या कंपनीचे मद्य लोकप्रिय आहे.

कॅप्टन मॉर्गन हा आघाडीचा ब्रँड

डियाजिओ कंपनीचा रमचा ब्रँड कॅप्टन मॉर्गन (Captain Morgan) हा बाजारातील आघाडीच्या ब्रँडपैकी एक आहे. इतके की डिएजिओ हे रशियामध्ये काम करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. रँडस्टॅड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्च रेटिंगनुसार, डिएजिओ हे रशियामधील टॉप-10 एम्प्लॉयरपैकी एक आहे. ही कंपनी रशियामध्ये सुमारे 300 लोकांना रोजगार देते, जिथे कर्मचार्‍यांचे सरासरी वय 30 वर्षे आहे.

किंगफिशर ब्रँडची मालकी

मात्र आता रशियात या सर्व ब्रँडच्या मद्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. नेक्स्टा टीव्हीच्या बातमीनुसार, डियाजिओने रशियाला होणारा दारूचा पुरवठा बंद केला आहे. याशिवाय H&M सारख्या कपड्यांच्या ब्रँडनेही रशियामध्ये त्यांचे कामकाज बंद केले आहे. डियाजिओ ही भारतात दारूचा व्यवसाय करणारी एक मोठी कंपनी आहे. कंपनीची युनायटेड बेव्हरेजेसमध्ये 50% पेक्षा जास्त भागीदारी आहे आणि किंगफिशर सारख्या ब्रँडची मालकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT