Todays Share Market Updates Dainik Gomantak
अर्थविश्व

Share Market मध्ये आठवड्याच्या पहिल्या दिवशीच ब्लडबाथ, निफ्टी 19,500 च्या जवळ बंद

Indian Share Market: आशियाई बाजारांची स्थिती संमिश्र होती. शांघाय, हाँगकाँग, सोल, बँकॉक, इंडोनेशियाचे बाजार लाल रंगात बंद झाले. त्याच वेळी, तैपेई आणि टोकियोच्या बाजारपेठांमध्ये वाढ दिसून आली.

Ashutosh Masgaunde

Bloodbath in share market on first day of week itself, Nifty closes near 19,500:

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. निफ्टी आणि सेन्सेक्स लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्स 670 अंकांनी म्हणजेच 0.93 टक्क्यांनी घसरून 71,355 वर तर निफ्टी 197.80 अंकांनी म्हणजेच 0.91 टक्क्यांनी घसरून 21,513 वर आला. आज निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही मुख्य स्तरांजवळ बंद झाले आहेत.

आजच्या सत्रातील घसरणीचा परिणाम मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांवरही दिसून आला. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 1.06 टक्क्यांनी घसरला आणि निफ्टीचा स्मॉलकॅप 100 निर्देशांक 0.62 टक्क्यांनी घसरला.

या ट्रेडिंग सेशनच्या घसरणीचा परिणाम लार्ज आणि मिड कॅप समभागांवर अधिक झाला. सर्वात मोठी घसरण बँकिंग शेअर्समध्ये झाली आहे. निफ्टी बँक 1.47 टक्क्यांनी घसरून 47,450 अंकांवर बंद झाला.

गेनर्स आणि लूजर्स

बाजारातील वाढत्या समभागांमध्ये एचसीएल टेक, पॉवर ग्रिड, सन फार्मा, एनटीपीसी, बजाज फायनान्स आणि टायटन कंपनी आघाडीवर होते.

भारती एअरटेल, एल अँड टी, टाटा मोटर्स, इन्फोसिस, मारुती सुझुकी, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स, जेएसडब्ल्यू स्टील, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, विप्रो, एचयूएल, टीसीएस, एम अँड एम, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, नेस्ले, आयटीसी आणि एसबीआयचे समभाग सर्वाधिक घसरले.

बाजार घसरण्याचे कारण

बाजारातील घसरणीचे कारण प्रॉफिट बुकींग असल्याचे मानले जात आहे, ज्याचा सर्वात मोठा परिणाम बँकिंग आणि आयटी समभागांवर दिसून आला आहे. आजच्या घसरणीत जागतिक संकेतांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

जागतिक बाजारात कमजोरी

आशियाई बाजारांची स्थिती संमिश्र होती. शांघाय, हाँगकाँग, सोल, बँकॉक, इंडोनेशियाचे बाजार लाल रंगात बंद झाले. त्याच वेळी, तैपेई आणि टोकियोच्या बाजारपेठांमध्ये वाढ दिसून आली. कच्च्या तेलाचा बेंचमार्क ब्रेंट क्रूड 2.16 टक्क्यांनी घसरून $77 प्रति बॅरल आणि WTI 2.29 टक्क्यांनी घसरून $72 प्रति बॅरल झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Goa Flight: विमानात तांत्रिक बिघाड; दिल्लीतून गोव्याला येत असलेले विमान मुंबईला वळवले

पावसाळी अधिवेशनापूर्वी आमदार विजय सरदेसाई अडचणीत; सभापती तवडकरांबाबत जातीय वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिस तक्रार

Israel Syria Attack: दमास्कसमधील 'ड्रोन हल्ला' लाइव्ह! स्फोट होताच टीव्ही अँकरची उडाली भंबेरी, व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: सोनं-चांदी झालं स्वस्त! सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या दर

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

SCROLL FOR NEXT