'गोव्याचा बँकॉक करायचाय का?'; 'टॉपलेस गर्ल'च्या व्हिडिओवरून विधानसभेत कार्लुस संतापले

फेरेरा यांनी याप्रकरणी सक्त शब्दात संताप व्यक्त अशा बेशिस्त पर्यटकांना मज्जाव करण्याची गरज व्यक्त केली आहे.
Goa Assembly Monsoon Session 2023 Carlos Ferreira
Goa Assembly Monsoon Session 2023 Carlos Ferreira Dainik Gomantak

Goa Assembly Monsoon Session 2023 Carlos Ferreira

दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध पर्रा रोड येथून एक युवती टॉपलेस होऊन कार चालवतानाचा व्हिडिओ समोर आला होता. पर्यटकाच्या या विचित्र घटनेमुळे मार्गावरील इतर पर्यटक आणि स्थानिक चक्रावून गेले होते. या प्रकरणाचे पडसाद पावसाळी अधिवेशनात उमटले असून, यावरून काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त करत अशाप्रकारच्या पर्यटकांची आपल्याला गरज नाही असे सभागृहात सांगितले.

आमदार कार्लुस फेरेरा काय म्हणाले?

पर्रा रोडवर एक युवती टॉपलेस होऊन कार चालवतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. अशा प्रकारचे प्रकारचे बेशिस्त पर्यटक खरचं आपल्याला हवे आहेत का? मी आमदार मायकल लोबो यांना विनंतीपूर्वक सांगितले की अशाप्रकराचे बेशिस्त पर्यटक आपल्याला अजिबात नको आहेत. राज्यात चांगले पर्यटक आले तर पर्यटन व्यवसाय वाढेल. पण, बेशिस्त पर्यटक येत राहिले तर चांगले पर्यटक दुरावतील असे कार्लुस फेरारा म्हणाले.

राज्यात कॅसिनोची संख्या वाढण्याबाबत बोलले जाते, मसाज पार्लर वाढवले जाणारहेत आणि आता क्रॉस मसाज सुरू करण्याचे सांगितले जात आहे. कोणत्या प्रकारची संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. गोव्याला बँकॉक करायचाय का? असा सवाल कार्लुस फेरारा यांनी सभागृहात बोलताना केला.

Goa Assembly Monsoon Session 2023 Carlos Ferreira
Goa Petrol-Diesel Price: 427 दिवसांत इंधन दरात मोठा बदल नाही, गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे आजचे भाव जाणून घ्या

पर्यटकांचा वर्तणूक देखील महत्वाची आहे, काहीजण येतात आणि IAS, IPS अधिकाऱ्यांना फोन करू अशी भाषा वापरतात. असे पर्यटक आम्हाला नको आहेत असेही कार्लुस फेरेरा म्हणाले.

काय आहे प्रकरण?

दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध पर्रा रोडवर एक युवती टॉपलेस होऊन कार चालवतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे मार्गावरील इतर पर्यटक आणि स्थानिक चक्रावून गेले आहे. व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर याबाबत तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या. आता फेरेरा यांनी याप्रकरणी सक्त शब्दात संताप व्यक्त अशा बेशिस्त पर्यटकांना मज्जाव करण्याची गरज व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com