finance minister nirmala sitaraman  Dainik Gomantak
अर्थविश्व

Old Pension Scheme: देशभरात होणार जुनी पेन्शन योजना लागू, जाणून घ्या नेमकं प्रकरण?

Old Pension News: जुन्या पेन्शन योजनेबाबत अनेक गोष्टी सुरु आहेत. केंद्र सरकार नवीन पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना सुरु करु शकते.

दैनिक गोमन्तक

Old Pension News: जुन्या पेन्शन योजनेबाबत अनेक गोष्टी सुरु आहेत. केंद्र सरकार नवीन पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना सुरु करु शकते. त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकारने लोकसभेत माहिती दिली आहे. यासोबतच अनेक राज्यांमध्ये कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेचा लाभ घेत आहेत. पेन्शन व्यवस्थेबाबत केंद्र सरकार काय योजना आखत आहे, ते जाणून घेऊया...

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे संदेश

अलीकडेच, सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सरकार नवीन पेन्शन प्रणाली पूर्णपणे रद्द करु शकते, असा दावा केला जात आहे. हा व्हायरल मेसेज पाहून पीआयबीने याबाबत माहिती दिली आहे. या व्हायरल मेसेजचे सत्य काय आहे, ते जाणून घेऊया...

पीआयबीने ट्विट केले आहे

पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये म्हटले की, 'पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, केंद्र सरकार नवीन पेन्शन योजना (एनपीएस) रद्द करुन जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करु शकते. हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचे पीआयबीने लिहिले आहे. जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही.'

सरकारकडे अशी कोणतीही योजना नाही

दुसरीकडे, केंद्र सरकारने (Central Government) अशी कोणतीही माहिती दिलेली नाही, असे पीआयबीने म्हटले आहे. जुनी पेन्शन प्रणाली लागू करण्यासाठी सरकारची कोणतीही योजना नाही. याशिवाय असे व्हायरल मेसेज कोणाशीही शेअर करु नका आणि त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असे पीआयबीने म्हटले आहे.

NPS चे पैसे परत करण्याची तरतूद नाही

यासोबतच, राजस्थान, झारखंड आणि छत्तीसगड (Chhattisgarh) सारख्या अनेक राज्यांनी केंद्र सरकारला जुनी पेन्शन प्रणाली बहाल करण्याबाबत अधिसूचना जारी केली होती. यासोबतच एनपीएसचे पैसे परत करण्याचा प्रस्तावही पाठवण्यात आला होता, त्यानंतर या राज्य सरकारांना एनपीएसचे पैसे परत करण्याची तरतूद नसल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Duleep Trophy 2025 Final: 11 वर्षांनंतर सेंट्रल झोनच्या झोळीत दुलीप ट्रॉफी, अंतिम सामन्यात दक्षिण विभागाचा 6 विकेट्सने पराभव

"99 प्रॉब्लेम्स आहेत, पण नवऱ्याची कटकट नाही", दक्षिणी अभिनेत्रीचे डिवोर्स फोटोशूट; नेटकरी थक्क

Viral Video: 1997 साली जमिनीखाली गाडलं गेलेलं जलजीराचे पॅकेट 27 वर्षानंतर जसंच्या तसं सापडलं, नेटकरी म्हणाले, 'Don't Use Plastic'

Curchorem: ...तर पालिकेसमोरच मासळी विक्री करू! कुडचडेतील पारंपरिक विक्रेत्‍यांचा इशारा; बेकायदेशीर विक्रीमुळे असंतोष

Asia Cup 2025 Points Table: पाकिस्तानवर मात करूनही Team Indiaचं नुकसान, पॉइंट्स टेबलमध्ये झाली घसरण

SCROLL FOR NEXT