Nirmala Sitharaman  Dainik Gomantak
अर्थविश्व

Bank Privatisation बाबत अपडेट, करोडो खातेदारांना मोठा झटका; अर्थमंत्र्यांनी केली घोषणा!

Bank Privatisation Update: मोदी सरकारकडून देशभरातील अनेक बँकांचे खाजगीकरण केले जात आहे.

Manish Jadhav

Bank Privatisation Update: मोदी सरकारकडून देशभरातील अनेक बँकांचे खाजगीकरण केले जात आहे. सरकार यावर्षी आणखी एका सरकारी बँकेचे खाजगीकरण करणार आहे. यावर वेगाने काम सुरु आहे.

तुमचेही सरकारी बँकेत खाते असेल, तर कोणत्या बँकेचे खासगीकरण होणार आहे, हे आधी कळले पाहिजे. आज माहिती देताना दीपम सेक्रेटरी यांनी सांगितले की, IDBI बँकेच्या (IDBI Bank Privatization News) खाजगीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरु आहे.

मीडिया रिपोर्ट फेटाळले

केंद्र सरकारने शुक्रवारी सांगितले की, आयडीबीआय बँकेच्या (IDBI Bank) निर्गुंतवणुकीची प्रक्रिया निर्धारित धोरणात्मक विक्री प्रक्रियेनुसार सुरु आहे. आयडीबीआयची निर्गुंतवणूक पुढे ढकलली जाऊ शकते असे सांगण्यात येत असल्याच्या मीडिया वृत्तांनाही त्यांनी फेटाळून लावले.

दीपम सेक्रेटरी यांनी ट्विट केले आहे

डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट (DIPAM) ने सांगितले की, बँकेतील स्टेक सेल एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) स्टेजच्या पलीकडे गेला आहे. दीपमचे सचिव तुहिन कांत पांडे यांनी ट्विट केले की, विविध EOI प्राप्त केल्यानंतर, व्यवहार आता विहित प्रक्रियेनुसार प्रगतीपथावर आहे.

LIC ची 61 टक्के हिस्सेदारी आहे

आयडीबीआय बँकेतील सुमारे 61 टक्के स्टेक आणि एलआयसीच्या (LIC) धोरणात्मक विक्रीसाठी सरकारने जानेवारीमध्ये बोलीच्या अनेक प्रारंभिक फेऱ्या पार पाडल्या आहेत.

सरकारचा वाटा किती?

आयडीबीआय बँकेतील 30.48 टक्के सरकार आणि एलआयसीच्या 30.24 टक्के समभागांसह एकूण 60.72 टक्के समभागांच्या विक्रीसाठी गेल्या ऑक्टोबरमध्ये संभाव्य खरेदीदारांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. सध्या या बँकेत सरकार आणि एलआयसी या दोघांचा मिळून 94.72 टक्के हिस्सा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: अंत्यविधीच्या ठिकाणी 'ऑर्केस्ट्रा'! एका बाजूला चिता जळतेय, दुसऱ्या बाजूला गाण्यांवर डान्स; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

Ind A vs SA A: सलामीवीर ढेपाळले, मधल्या फळीनेही हात टेकले, आफ्रिकेने टीम इंडियाला 73 धावांनी चारली पराभवाची धूळ; क्लीन स्वीपचे स्वप्न भंगले! VIDEO

Konkan Railway: कोकण रेल्वेतील मोठी कारवाई! नागरकोइल-गांधीधाम एक्सप्रेसमध्ये दारुच्या बाटल्यांनी भरलेल्या बेवारस बॅगा जप्त; 'टीसी'च्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस

Goa Tourism: आखाती देशांतील पर्यटक आकर्षित करण्यासाठी गोवा सज्ज! थेट बहरीनमध्ये आयोजित केलाय रोड शो

World Cup 2026: क्रिकेट वर्ल्ड कप शेड्यूल जाहीर, भारत-पाकिस्तान सामन्याबाबत आयसीसीनं घेतला मोठा निर्णय; चाहत्यांची वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT