Gas Cylinders
Gas Cylinders  Dainik Gomantak
अर्थविश्व

Pradhan Mantri Ujjwala Yojana: देशातील 9.59 कोटी कुटुंबांना मोठा दिलासा, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना...

Manish Jadhav

Pradhan Mantri Ujjwala Yojana: केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत दरवर्षी 12 गॅस सिलिंडरवर मिळणारे अनुदान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणखी एक वर्षासाठी वाढवले ​​आहे.

देशातील 9.5 कोटींहून अधिक लोकांना दरमहा 200 रुपये गॅस सिलिंडरचा लाभ मिळणार आहे. त्याचा सरकारवरील बोजा 7,680 कोटी रुपयांनी वाढणार आहे. यापूर्वी चालू आर्थिक वर्षात 6,100 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

दरम्यान, PMUY ग्राहकाचा (Customer) सरासरी LPG वापर 2019-20 मधील 3.01 रिफिलवरुन 20 टक्क्यांनी वाढून 2021-22 मध्ये 3.68 झाला आहे. गरीब घरातील प्रौढ महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्यासाठी सरकारने मे 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरु केली.

सबसिडी बँक खात्यात हस्तांतरित केली जाते

हे अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाते. सरकारी तेल विपणन कंपन्या म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) 22 मे 2022 पूर्वीपासून ही सबसिडी देत ​​आहेत.

भू-राजकीय तणावामुळे एलपीजीच्या आंतरराष्ट्रीय किमतीत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, PMUY लाभार्थ्यांना LPG च्या चढ्या किमतींपासून संरक्षण मिळेल.

गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत

सध्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली होती. आकडेवारीनुसार, देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) घरगुती गॅस सिलेंडरची किंमत प्रति गॅस सिलेंडर 1,103 रुपयांवर गेली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT