Pradhan Mantri Kisan Samman Nidhi: पीएम किसानच्या हप्त्यानंतर कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा, 14 कोटी शेतकऱ्यांना...!

Farmers Income: शेती किफायतशीर करुन अल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
Narendra Singh Tomar
Narendra Singh TomarDainik Gomantak

Narendra Singh Tomar: केंद्र सरकार कृषी क्षेत्राच्या विकासावर सातत्याने भर देत आहे. यामुळेच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी तरुणांना शेतीकडे आकर्षित करण्याबाबत सांगितले.

यासोबतच शेती किफायतशीर करुन अल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे पाहता शासनाने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत.

पीएम किसानचे 13 हप्ते भरले आहेत

सरकारने (Government) शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या योजनांमध्ये सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. यामध्ये शासनाकडून शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

हे पैसे प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातात. नुकताच 27 फेब्रुवारी रोजी शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात 13 वा हप्ता जमा केला आहे.

Narendra Singh Tomar
PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवशी खात्यात पैसे होणार जमा

मोदी सरकारने उचललेल्या पावलांचा उल्लेख केला

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) या उद्योग संघटनेच्या परिषदेला संबोधित करताना, कृषी मंत्री म्हणाले की, भारतीय शेती फायदेशीर करण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कृषी अर्थव्यवस्था (Economy) मजबूत करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि विकास (R&D) आणि उद्योग सहकार्याची गरज आहे.

तसेच, पीएम-किसान योजना, 10,000 शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) स्थापन करणे आणि एक लाख कोटी कृषी पायाभूत सुविधा निधी जारी करणे यासारख्या कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी मोदी सरकारने गेल्या 9 वर्षात उचललेल्या पावलांचा त्यांनी उल्लेख केला.

Narendra Singh Tomar
PM Kisan Samman Nidhi: 'या' राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा फटका, 13 वा हप्ता...!

तोमर म्हणाले की, 'शेती हे आपल्या सर्वांचे प्राधान्य क्षेत्र आहे.' हे क्षेत्र फायदेशीर करण्यासाठी, शेतकऱ्यांची समृद्धी वाढवण्यासाठी आणि कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी तंत्रज्ञान, संशोधन आणि उद्योगाच्या सहकार्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com