Big hike in Vodafone Idea Shares investors in big profit  Dainik Gomantak
अर्थविश्व

व्होडाफोन आयडियाचा गुंतवणूकदारांना बंपर परतावा, शेअर्समध्ये मोठी वाढ

व्होडाफोन आयडियाच्या (Vodafone Idea Shares) शेअरची किंमत 15.38 टक्क्यांनी वाढली.

दैनिक गोमन्तक

व्होडाफोन आयडियामध्ये (Vodafone Idea) गुंतवणूक केलेले गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. कारण कंपनीचे शेअर्स गेल्या काही महिन्यात तेजीतच दिसत आहेत. जर आपण गेल्या पाच महिन्यांबद्दल बोललो तर व्होडाफोनच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना तिप्पट परतावा दिला आहे.(Big hike in Vodafone Idea Shares investors in big profit)

गुरुवारी व्होडाफोन आयडियाच्या (Vodafone Idea Shares) शेअरची किंमत 15.38 टक्क्यांनी वाढली. या वाढीसह, व्होडाफोनचा शेअर व्यवहाराच्या शेवटी 16.50 रुपयांवर बंद झाला. एका अहवालानुसार, कंपनीच्या शेअरमध्ये झालेली वाढ ही दूरसंचार क्षेत्रासाठी सरकारने अलीकडेच उचललेल्या पावलांचा परिणाम आहे. गेल्या एक महिन्याबद्दल बोलायचे झाले तर कंपनीचा शेअर जवळपास 60 टक्क्यांनी वाढला आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या काही दिवसांत व्होडाफोन आयडियाच्या शेअरच्या किमती वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. यामध्ये, दूरसंचार कंपन्यांना सरकारकडून एजीआर थकबाकी, स्पेक्ट्रमवरील मदत पॅकेजच्या घोषणेचा फायदा झाला आहे. याशिवाय, त्याचे टॅरिफ प्लॅन वाढवणे हे देखील सर्वात मोठे कारण आहे.अलीकडेच, कंपनीने टॅरिफ प्लॅनमध्ये 25 टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. तेव्हापासून शेअरचे भाव वाढत आहेत. याशिवाय Vodafone Idea 13 डिसेंबर रोजी बॉण्डधारकांना व्याज देणार आहे. कंपनीने यासाठी निधी देखील उभारला आहे.

तर दुसरीकडे काल सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात (Share Market) वाढ दिसून आली व्यवहारात सेन्सेक्स 157 अंकांनी वाढून 58,807 वर तर निफ्टी 47 अंकांच्या वाढीसह 17517 च्या पातळीवर बंद झाला. काल व्यवसायाने मीडिया आणि एफएमसीजी क्षेत्रात तेजी नोंदवली आहे तर दुसरीकडे बँकिंग शेअर्सवर दबाव दिसून आला. निफ्टीमध्ये समाविष्ट असलेले 26शेअर्स काल वाढीसह बंद झाले, त्यापैकी 11 शेअर्स 1 टक्‍क्‍यांहून अधिक, ITC 4.91 टक्‍क्‍यांनी, L&T 3.01 टक्‍क्‍यांनी आणि Asian Paints 2.2 टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह बंद झाले. त्याच वेळी, घसरलेल्या शेअर्समध्ये 3 कंपन्यांचे शेअर्स 1 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. सर्वाधिक घसरणाऱ्या शेअर्समध्ये मध्ये एचडीएफसी बँक 1.79 टक्के, टायटन 1.35 टक्के आणि नेस्ले 1.12 टक्क्यांनी घसरले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT