Delhi Dainik Gomantak
अर्थविश्व

NDMC चा मोठा निर्णय! दिल्लीत हॉटेलमध्ये राहण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे

2022-23 या आर्थिक वर्षासाठी, NDMC ने विविध ट्रेड्ससाठी परवाना आणि नूतनीकरण शुल्कासाठी वार्षिक शुल्क वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

देशाची राजधानी दिल्लीत आगामी काळात हॉटेलमध्ये राहणे महाग होऊ शकते, आणि याचे प्रमुख कारण म्हणजे नवी दिल्ली नगर परिषदेने (NDMC) घेतलेला निर्णय. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी, NDMC ने विविध ट्रेड्ससाठी परवाना आणि नूतनीकरण शुल्कासाठी वार्षिक शुल्क वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता हॉटेल मालकाला जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. अशा परिस्थितीत हॉटेल मालक ग्राहकांकडून या शुल्काची परतफेड देखील करू शकतात. (Big decision of NDMC You will have to pay more to stay in a hotel in Delhi)

किती वाढले आहे

फाईव्ह स्टारच्या परवाना शुल्कामध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. NDMC ने पंचतारांकित हॉटेल्सच्या परवाना शुल्कामध्ये 10,300 रुपयांची वाढ केली आहे. या परवान्यासाठी पूर्वी 65,500 रुपये मोजावे लागत होते, तर आता त्यासाठी 75,300 रुपये मोजावे लागणार आहेत. 100 पेक्षा जास्त बेड असलेल्या अतिथी गृहांना आता 26,200 रुपयांऐवजी 30,100 रुपये मोजावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

20 खाटांचे गेस्ट हाऊस मालकांना आता 3000 रुपये, 21 ते 50 खाटांचे गेस्ट हाऊस 7,500 रुपये, 50 ते 100 खाटांचे 15 हजार रुपये असे खर्च करावे लागणार आहेत. त्याचबरोबर सिनेमा हॉल, हॉटेल, क्लब आणि स्पामधील डान्सिंग हॉलसाठी 7500 रुपये मोजावे लागतील. त्याची वार्षिक फी रु.ने वाढवण्यात आली आहे.

50 पेक्षा जास्त जागा असलेल्या कॅफे आणि कॉफी शॉपसाठी 6500 ऐवजी 7500 रुपये, तर 50 पेक्षा जास्त जागा असलेल्या रेस्टॉरंट्स आणि कॉफी शॉप्ससाठी 1,500 रुपये मोजावे लागणार आहेत. दुसरीकडे, NDMC ने ड्राय क्लीनर, डिझेल जनरेटर संच यांसारख्या सुविधांसाठी जुने दर कायम ठेवण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT