Bharatpur overtakes Jamtara to become capital of Cyber Crime, 80 percent of cyber crimes in ten districts in the country. Dainik Gomantak
अर्थविश्व

Cyber Crime ची नवी राजधानी! जमताराला भरतपूरने टाकले मागे, देशातील 80 टक्के सायबर गुन्हे दहा जिल्ह्यातून

Bharatpur Cyber Crime: 2020-23 या कालावधीतील सायबर गुन्ह्यांच्या ट्रेंडवर सोमवारी प्रसिद्ध झालेल्या श्वेतपत्रिकेत असे म्हटले आहे की, ऑनलाइन आर्थिक फसवणुकीत अनधिकृत UPI ट्रान्झॅक्शन प्रामुख्याने लक्ष्य केले जात आहेत.

Ashutosh Masgaunde

Bharatpur Overtakes Jamtara to become Capital of Cyber Crime, 80 Percent of Cyber Crimes in ten Districts in the Country: झारखंडमधील जामतारा आणि हरियाणातील नूह, जे देशातील सायबर गुन्ह्यांची केंद्रे म्हणून कुप्रसिद्ध आहेत, त्यांची जागा आता राजस्थानमधील भरतपूर आणि उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्याने घेतली आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूरमध्ये सुरू झालेल्या एका स्टार्टअपने आपल्या अभ्यासात हा दावा केला आहे.अभ्यासानुसार देशातील 80 टक्के सायबर गुन्हे हे टॉप 10 जिल्ह्यांमधून घडतात.

तंत्रज्ञान हे सोयीसाठी आहे पण आज ते फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांचे एक मोठे स्त्रोत बनले आहे. देशात दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांची मोठ्या प्रमाणात नोंद होत आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की देशात असे 10 जिल्हे आहेत, जेथून देशातील एकूण सायबर क्राइमचे 80 टक्के गुन्हे घडत आहेत. म्हणजेच ऑनलाइन फसवणुकीत ते आघाडीवर आहेत.

बिझनेस स्टँडर्डच्या बातमीनुसार, ऑनलाइन फसवणूक करणारे UPI ट्रान्झॅक्शन फ्रॉडला आपले टारगेट करत आहेत.

हे 10 जिल्हे फसवणुकीचे केंद्र

समोर आलेल्या धक्कादायक आकडेवारीनुसार, भरतपूर, मथुरा, नूह, देवघर, जामतारा, गुरुग्राम, अलवर, बोकारो, करमतंड, गिरिडीह हे जिल्हे आहेत जिथून देशातील एकूण सायबर गुन्ह्यांपैकी 80 टक्के गुन्हे घडतात.

यामध्ये भरतपूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. एकूण 18 टक्के एकट्या सायबर फसवणुकीचा वाटा आहे. त्याचप्रमाणे मथुरा दुसऱ्या क्रमांकावर आणि दिल्लीला लागून असलेले गुरुग्राम सहाव्या स्थानावर असून, त्यांचा वाटा अनुक्रमे १२ टक्के आणि ८.१ टक्के आहे.

आमचे विश्लेषण भारतातील 10 जिल्ह्यांवर केंद्रित आहे जिथे सर्वाधिक सायबर गुन्हे घडतात. या जिल्ह्यांतील सायबर गुन्ह्यांचे प्रमुख चालकांना शोधून प्रभावी प्रतिबंध आणि निर्मूलन धोरणे आखण्यासाची आवश्यक आहे.
हर्षवर्धन सिंग- FCRF चे सह-संस्थापक

UPI ट्रान्झॅक्शन टारगेट

2020-23 या कालावधीतील सायबर गुन्ह्यांच्या ट्रेंडवर सोमवारी प्रसिद्ध झालेल्या श्वेतपत्रिकेत असे म्हटले आहे की, ऑनलाइन आर्थिक फसवणुकीत अनधिकृत UPI ट्रान्झॅक्शन प्रामुख्याने लक्ष्य केले जात आहे.

बातम्यांनुसार, हा अभ्यास आयआयटी कानपूर आणि फ्यूचर क्राइम रिसर्च फाउंडेशनने जारी केला आहे.

यामध्ये अनेक चिंताजनक ट्रेंड समोर आले आहेत. हा डेटा नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो आणि संसद आणि थिंक टँक यांसारख्या विविध प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.

आर्थिक फसवणूक सर्वाधिक

अहवालानुसार, एकूण सायबर गुन्ह्यांपैकी ऑनलाइन आर्थिक फसवणूक सर्वाधिक ७७.४१ टक्के आहे.

यानंतर, ऑनलाइन आणि सोशल मीडियाशी संबंधित फसवणूक 12.02 टक्के आहे. याशिवाय पीसी-कॉम्प्युटर हॅकिंग आणि त्याच्या डॅमेजचाही समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

SCROLL FOR NEXT